चाकूचा धाक दाखवून कार लुटणाऱ्या दोघांना कोंढवा पोलिसांकडून अटक

पुणे : पोलिसनामा ऑनलाईन – चाकूचा धाक दाखवून कार लुटून नेणाऱ्या दोघांना कोंढवा पोलिसांनी अटक केली आहे. विशाल नानासाहेब आव्हाड (वय १९, रा. कृष्णानगर, मोहमदवाडी) आणि शाहरुख शौकत खान (वय २५, रा. कृष्णानगर, मोहम्मदवाडी) असे अटक केलेल्यांची नावे आहेत. गुन्ह्यात चोरलेली कार, चाकू जप्त करण्यात आले आहे. त्यांच्याकडून तीन गुन्हे उघडकीस आले आहेत. त्यातील रिक्षा व दोन मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत.

फिर्यादी हे कारने जात असताना १७ फेबु्रवारी रोजी रात्री पावणेअकरा वाजता बिटॉस हॉटेलसमोर दोघांना त्यांना अडविले त्यांच्याकडील कार जबरदस्तीने चोरुन नेली होती. कोंढवा पोलीस ठाण्यात त्यांनी फिर्याद दिल्यानंतर त्यांना रेकॉर्डवरील जबरी चोरी करणाऱ्या गुन्हेगारांचे फोटो दाखविले त्यात त्यांनी विशाल आव्हाड याला ओळखले पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी केल्यावर त्याने शाहरुख खान याच्यासोबत हा गुन्हा केल्याची कबुली दिली त्यांच्याकडून आणखी तीन गुन्हे उघडकीस आले आहेत.

ही कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड, पोलीस निरीक्षक गुन्हे महादेव कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक चेतन मोरे, पोलीस उपनिरीक्षक संतोष शिंदे, सहायक फौजदार इक्बाल शेख, हवालदार उमाकांत स्वामी, विशाल गवळी, गणेश आगम,भापकर, अझीम शेख, योगेश कुंभार, कौस्तुभ जाधव, संतोष नाईक, अमित साळुंखे, संजीव कळंबे, निलेश वनवे, सुशील धिवार, ज्योतिबा पवार, उमेश शेलार,किशोर वळे,आदर्श चव्हाण यांच्या पथकाने केली.