Kondhwa Police Pune | मोक्का गुन्ह्यातील फरार आरोपीला कोंढवा पोलिसांकडून अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Kondhwa Police Pune | चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यातील (Chaturshringi Police Station) मोक्का गुन्ह्यातील (Pune Police MCOCA Action) आरोपीला कोंढवा पोलिसांनी अटक केली आहे. ही कारवाई शनिवारी (दि.20) कमला चौक कोंढवा (Kamla Chowk Kondhwa) येथे करण्यात आली. हर्षद सतीश चांदणे Harshad Satish Chandane (वय 21 रा – राजीव गांधी नगर, बुद्धविहारा जवळ खडकी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपी मोक्का गुन्ह्यात मागील सहा महिन्यापासून फरार होता. तो पोलिसांना सापडत नव्हता. अखेर कोंढवा पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या आहेत.

आरोपी हर्षद चव्हाण याच्यावर चतु:श्रृंगी पोलीस स्टेशन येथे आयपीसी कलम 307, 323, 141, 144, 147, 148, 149 सह क्रिमिनल लॉ अमेडमेंट अॅक्ट, महाराष्ट्र पोलीस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्याचा (मोक्का) अंतर्भाव करण्यात आला आहे. मोक्का कारवाई झाल्यानंतर आरोपी फरार झाला होता. मागील सहा महिन्यापासून पोलीस त्याचा शोध घेत होते. मात्र, तो पोलिसांना गुंगारा देत होता.

शुक्रवारी पोलीस उपनिरीक्षक बालाजी डिगोळे (PSI Balaji Digole), पोलीस अंमलदार शाहिद शेख, लक्ष्मण होळकर,
संतोष बनसुडे, सुजित मदन, सूरज शुक्ला, गोरख चिनके व निलेश देसाई हे लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने हद्दीत
पेट्रोलिंग करीत होते. त्यावेळी पोलीस अंमलदार सूरज शुक्ला व सुजित मदन यांना माहिती मिळाली की,
चतु:श्रृंगी पोलीस स्टेशन येथे दाखल असलेल्या मोक्का गुन्ह्यात सहा महिन्यांपासून फरार असलेला आरोपी हर्षद चांदणे
हा कमेला चौक कोंढवा येथे आलेला आहे. मिळालेल्या माहितीच्या आधारे पथकाने सापळा रचून शिताफीने आरोपीला
ताब्यात घेतले.

ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक बालाजी डिगोळे, पोलीस अंमलदार शाहिद शेख, लक्ष्मण होळकर, संतोष बनसुडे, सुजित मदन, सूरज शुक्ला, गोरख चिनके व निलेश देसाई यांच्या पथकाने केली.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Police Personnel Died In Accident | दोन दुचाकींची समोरासमोर धडक, पोलीस कर्मचाऱ्यासह दोघांचा मृत्यू

Amol Kolhe | मी, माझं, माझ्यासाठी हा वैयक्तिक अजेंडा डोळ्यासमोर ठेऊन मी निवडणूक लढवत नाही – डॉ. अमोल कोल्हे

Pune Crime Court | पुणे : पतीच्या खुनाच्या गुन्ह्यातील महिला आरोपीची गुन्ह्यातून निर्दोष मुक्तता

Baramati Lok Sabha Election 2024 | अजितदादांचा डमी अर्ज नामंजूर, बारामतीमध्ये नणंद विरूद्ध भावजयी अशीच लढत