Kondhwa Pune Crime News | प्रेमसंबंधाला विरोध केल्याने प्रेयसीच्या भावाला मारहाण

marhan
ADV

पुणे : Kondhwa Pune Crime News | त्यांच्या प्रेमसंबंधाना घरच्यांनी विरोध केल्याच्या रागातून प्रियकराने तिच्या भावाला बेदम मारहाण (Marhan) केली.

याबाबत एका १९ वर्षाच्या तरुणाने कोंढवा पोलीस ठाण्यात (Kondhwa Police Station) फिर्याद दिली आहे. त्यानुसार अब्दुल रेहमान बागवान (Abdul Rehman Bagwan) व त्यांचे साथीदार आयान, महमद सुफियान यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ही घटना कोंढव्यातील साईबाबानगर (Sai Baba Nagar Kondhwa) येथे मंगळवारी सकाळी ८ वाजता घडली.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची बहिण व रेहमान यांच्या प्रेमसंबंधांना घरच्यांनी विरोध केला होता. त्याचा राग मनात धरुन रेहमान याने फिर्यादी याला शिवीगाळ करुन त्याच्या जवळील पट्ट्याने पाठीवर मारहाण केली. आयान, महमद, सुफियान यांनी लाथाबुक्क्यांनी व हाताने मारहाण करुन जखमी केले. त्याला वाचविण्यासाठी फिर्यादीचे वडिल आले असताना आरोपी पळून जात असताना रेहमान याच्या जवळील लोखंडी कोयता खाली पडला. सहायक पोलीस निरीक्षक जाधव तपास करीत आहेत. (Kondhwa Pune Crime News)

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

पोलीसनामाच्या इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/policenamaa

हे देखील वाचा

Hadapsar Pune Crime News | हडपसरमधील ‘त्या’ रिव्हर्स थरारमधील कारण आले पुढे; पिकअप वाहन चालकावर गुन्हा दाखल

Pune ACB Trap Case | अबब! दीड लाखांसाठी 50 हजारांची मागितली लाच; PMRDA चे अभियंता, इंजिनिअरसह तिघांना अटक

Ajit Pawar | ‘मुख्यमंत्री करतो असं सांगितलं असतं तर शिंदेंआधी मीच पूर्ण पक्ष घेऊन आलो असतो’ – अजित पवार

Total
0
Shares
Related Posts