Kondhwa Pune Crime News | कोंढवा: आईची भेट करुन देतो सांगून 18 वर्षाच्या तरुणीला घरी नेऊन केला लैंगिक अत्याचार; Video काढून 2 महिने करत होता ब्लॅकमेल, 19 वर्षाच्या क्लासमेटला अटक

Kondhwa Pune Crime News | Kondhwa: 18-year-old girl was sexually assaulted by taking her home saying she would visit her mother; A 19-year-old classmate was arrested for blackmailing the video for 2 months
File Photo

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Kondhwa Pune Crime News | महाविद्यालयातील तरुणीबरोबर ओळख वाढवून आईशी भेट करुन देतो, असे सांगून तरुणीला तो घरी घेऊन आला. तिच्यावर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार (Sexual Harassment) केला. त्याने तिच्या नकळत व्हिडिओ काढला. त्यानंतर तो व्हिडिओ व्हायरल करायची धमकी देऊन तो गेली २ महिने या तरुणीला ब्लॅकमेल करुन तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार करीत असल्याचा प्रकार समोर आला आहे. (Rape Case)

याप्रकरणी एका १८ वर्षाच्या तरुणीने कोंढवा पोलीस ठाण्यात (Kondhwa Police Station) फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी तिच्या १९ वर्षाच्या क्लासमेटला अटक केली आहे. ही घटना नोव्हेंबर २०२४ ते १२ जानेवारी २०२५ दरम्यान आरोपीच्या घरी व लॉजवर घडली.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुणी आणि आरोपी हे एकाच कॉलेजमध्ये शिकतात. आरोपी तरुणाने फिर्यादीला आईची भेट करुन देतो, असे सांगून तिचा विश्वास संपादन करुन आपल्या घरी आणले. घरी कोणीही नव्हते. तिच्याशी जबरदस्तीने शारीरीक संबंध ठेवले. तिच्या नकळत शरीरसंबंध ठेवतानाचा व्हिडिओ काढून फिर्यादीला दाखविला. त्यानंतर मी ज्यावेळी बोलवीन, त्या वेळेस मला भेटायचे व याबद्दल कोणासही काही सांगायचे नाही़, असे म्हणून तिला धमकाविले. फिर्यादी कॉलेजला गेले असताना फिर्यादीला व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन कॉलेजमधून आरोपी तिला दुचाकीवरुन लॉजवर घेऊन जात. तिच्याशी जबरदस्तीने शरीरसंबंध ठेवत व नंतर कॉलेजला आणून सोडत असत. कोणालाही काही न सांगण्याची धमकी देत. फिर्यादी खूप घाबरलेली असल्याने तिने हे कोणाला सांगितले नाही. १२ जानेवारी रोजी फिर्यादीने कॉलेजमध्ये आरोपीने सांगितलेले ऐकले नाही म्हणून कॉलेजच्या लायब्ररीमध्ये कानाखाली मारुन तिच्या हातातील बॅग फेकून मारली. गेली दोन महिने सुरु असलेल्या हा शारीरीक छळ असह्य झाल्याने या तरुणीने पोलिसांकडे धाव घेऊन फिर्याद दिली. पोलीस उपनिरीक्षक हसिना शेख (PSI Hasina Shaikh) तपास करीत आहेत.

Total
0
Shares
Related Posts