पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Kondhwa Pune Crime News | | दुकान बंद करण्याची धमकी देऊन चौघांनी दुकानातील सामानाची तोडफोड केली़ दुकानाच्या समोरील गल्लीत उभ्या असलेल्या वाहनांच्या काचा फोडून नुकसान करुन परिसरात दहशत पसविण्याचा प्रकार समोर आला आहे.
याबाबत विलास नारायणलाल उणेचा (वय ५०, रा. काकडे वस्ती, कोंढवा) यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात (Kondhwa Police Station) फिर्याद दिली आहे. पोलिसांची चौघांवर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना काकडे वस्तीतील जयश्री सुपार मार्केटमध्ये शनिवारी रात्री घडली.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे दुकानात असताना चौघे गुंड आले. त्यांनी शिवीगाळ करुन दुकान बंद करण्याची धमकी दिली. हातातील कोयत्याने दुकानाच्या काऊंटरची काच फोडली व त्यावर ठेवलेल्या फरसनच्या भरण्यावर कोयते मारून त्यांची तोडफोड करुन नुकसान केले. दुकानासमोरील गल्लीमध्ये रोडवर उभ्या असलेल्या वाहनांची काचा फोडून नुकसान केले. हातातील कोयते हवेत फिरवून परिसरात दहशत निर्माण केली.
कोंढवा पोलिसांनी आर्म अॅक्टखाली गुन्हा दाखल केला असून पोलीस उपनिरीक्षक गावडे तपास करीत आहेत.
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
हे देखील वाचा
Bibvewadi Pune Crime News | कुख्यात तडीपार गुन्हेगार निलेश कुडले याच्यावर वार; बिबवेवाडीतील घटना
Ajit Pawar | ठाकरे-फडणवीस वादात अजित पवारांची उडी; म्हणाले – ‘आता एकमेकांचे कपडे काढायचं बाकी…’