Kondhwa Pune Crime News | पुणे : साळुंखे विहारमध्ये एअरगनच्या फायरिंगने उडाली खळबळ; कोंढवा पोलिसांनी एअरगनसह एकाला घेतले ताब्यात

Kondhwa Pune Crime News | Pune: Airgun firing creates panic in Salunkhe Vihar; Kondhwa police arrest one with airgun

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Kondhwa Pune Crime News | साळुंखे विहार येथील एका घरावर गोळीबार झाल्याच्या घटनेने शहरात एकच खळबळ उडाली होती. या गोळीबारात खिडक्यांच्या काचांवर खड्डे पडल्याने घरातील घाबरुन गेले होते. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता समोरील इमारतीमधून एअरगनने फायरिंग केल्याचे उघडकीस आले. या घटनेत कोणी जखमी झाले नसून पोलिसांनी एकाला एअरगनसह ताब्यात घेतले आहे. (Kondhwa Police)

बिलाल जुल्फीकार शेख Bilal Zulfiqar Shaikh (वय २९, रा. रोषमा रेजन्सी, साळुंखे विहार) असे पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या तरुणाचे नाव आहे. (Airgun Firing Case)

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी दुपारी पोलीस नियंत्रण कक्षाला फोन आला. त्यात साळुंखे विहार येथे गोळीबार करण्यात आला आहे. या कॉलच्या अनुषंगाने कोंढवा पोलीस तेथे गेले. मनोज श्रीकांत कानडे (वय ५०, रा. शालिनी कॉटेज, साळुंखे विहार) यांच्या घरावर कोणीतरी चार राऊंड फायर केल्याचे दिसून येत होते. पोलीस निरीक्षक रऊफ शेख व तपास पथक तेथे गेले. त्यांनी तपासणी केली. त्यात त्यांच्या खालील घराच्या किचनच्या खिडकीवर एक खड्डा पडल्यासारखा दिसत आहे. पहिल्या मजल्यावर स्वयंपाकघराच्या खिडकीवर चार खड्डे पडल्याचे दिसत होते. त्यांच्या घरात तुटलेले छर्याचे दोन तुकडे मिळून आले. खड्डे पडल्याची दिशा पाहिल्यावर समोरच्या इमारतीमधून फायरिंग झाल्याचा पोलिसांना संशय आला. त्यांनी समोरच्या इमारतीत जाऊन चौकशी केल्यावर पहिल्या मजल्यावरील बिलाल शेख याने एअरगनमधून पाच छर्रे फायर केल्याचे सांगितले. पोलिसांनी एअरगनसह बिलाल शेख याला ताब्यात घेऊन कोंढवा पोलीस ठाण्यात आणले असून पुढील कारवाई करण्यात येत असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनय पाटणकर यांनी सांगितले.

Total
0
Shares
Related Posts