ADV

Kondhwa Pune Crime News | पुणे : लग्नाच्या आमिषाने पळवून नेले, अल्पवयीन मुलीवर गुजरातमध्ये बलात्कार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Kondhwa Pune Crime News | लग्नाच्या आमिषाने (Lure Of Marriage) 15 वर्षाच्या अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार (Minor Girl Rape Case) केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी कोंढवा पोलिसांनी (Kondhwa Police Station) उत्तर प्रदेशातील तरुणावर पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार 23 मे 2023 ते 10 जून 2024 या कालावधीत कोंढवा, गोवा आणि गुजरात येथे घडला आहे.

याबाबत अल्पवयीन मुलीच्या 39 वर्षीय वडिलांनी मंगळवारी (दि.11) कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार राजु रामनाथ गुप्ता Raju Ramnath Gupta (वय-23 रा. मोतीराम, जि. गोरखपुर, उत्तर प्रदेश) याच्यावर आयपीसी 363, 366, 376/2/एन, पोक्सो कलम 4 नुसार गुन्हा दाखल केला आहे.(Kondhwa Pune Crime News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने फिर्यादी यांची मुलशीसोबत ओळख केली. मुलगी अल्पवयीन असल्याचे माहित असताना देखील तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिला लग्नाचे आमिष दाखवले. पालकांच्या कायदेशीर रखवालीतून तिला त्यांच्या संमतीशिवाय पळवून घेऊन गेला. त्यानंतर मुलीला गोवा येथे घेऊन गेला. तेथून गुजरात मधील बडोदरा येथे राहणाऱ्या बहिणीच्या घरी घेऊन गेला. राजु गुप्ता याने बहिण बाहेर गेल्यानंतर अल्पवयीन मुलीसोबत वारंवार शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक एस. सुरवसे करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

MNS-BJP-Mahayuti | महायुतीत चौथा वाटेकरी, मनसेने महायुतीकडे ‘या’ 20 जागा मागितल्या? ; जाणून घ्या

RSS On BJP About Support Of Ajit Pawar | पुरेसे बहुमत असताना अजितदादांना सोबत का घेतलं? RSS ने भाजपाला सुनावलं

Sassoon Hospital | ससूनच्या डॉक्टरांची खाजगी मेडिकलवाल्यांशी ‘दुकानदारी’; ससून रुग्णालयाचा कारभार पुन्हा चव्हाट्यावर, कारवाई होणार? (Video)

Maha Vikas Aghadi | अखेर मविआचा तिढा सुटला; विधानपरिषद निवडणुकीतील दोन उमेदवारांचा अर्ज मागे