पुणे : पोलीसनामा ऑनलाईन –Kondhwa Pune Crime News | सावत्र वडिलांकडून होणारी मारहाण, मानसिक त्रास याला कंटाळून एका तरुणाने गळफास (Hanging Case) घेऊन आत्महत्या केली. संदीप ऊर्फ शब्बीर इब्राहिम शेख (वय ३०, रा. लक्ष्मीनगर, कोंढवा बुद्रुक) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. (Suicide Case)
याबाबत त्याची मावशी संगीता राजु बागवे (वय ५१, रा. लोहियानगर, गंज पेठ) यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात (Kondhwa Police Station) फिर्याद दिली आहे. यावरुन विजय सुमतराव कसोटे (रा. लक्ष्मीनगर, कोंढवा) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना कोंढव्यातील लक्ष्मीनगर येथे ३ ऑक्टोंबर २०२४ रोजी सायंकाळी घडली होती. फिर्यादीने सातत्याने केलेल्या पाठपुराव्यानंतर तब्बल ३ महिन्यांनी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या बहिणीने दुसरा विवाह केला आहे. सुरुवातीला तिची मुले फिर्यादीकडेच रहात होती. ती मोठी झाल्यावर ते आईकडे राहण्यास गेले. शब्बीर प्लम्बिंगची कामे करीत असत. विजय कसोटे हा शब्बीर शेख याचा छळ करत असत. त्याला मारहाण करीत. मानसिक त्रास देत असत. त्याच्याविरुद्ध पोलिसांकडे खोट्या नाट्या तक्रारी करत. या त्रासाला कंटाळून शब्बीर याने गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेची माहिती मिळताच फिर्यादी या त्यांच्या घरी गेल्या. शब्बीर याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णवाहिकेतून ससून रुग्णालयात नेण्यात येत होता. रुग्णवाहिकेत फिर्यादी यांना शब्बीरच्या खिशात चिढ्ढी मिळाली. त्यात त्याने आपल्या सावत्र वडिलांनी दिलेल्या मानसिक त्रासामुळे आत्महत्या करीत असल्याचे लिहिले होते. पोलिसांनी पंचनामा करताना मृत्यु पावलेल्या शब्बीरच्या कपड्यांचीही तपासणी केली नाही, असे त्यांच्या नातेवाईकांचे म्हणणे आहे. सहायक पोलीस निरीक्षक विकास बाबर (API Vikas Babar) तपास करीत आहेत.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा
https://www.instagram.com/policenamaa/?hl=en#