पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Kondhwa Pune Crime News | सिरम कंपनीमध्ये (Serum Institute of India) नोकरीचे आमिष दाखवून (Lure Of Job In Serum Institute) १ लाख ११ हजार रुपये घेऊन बनावट अपॉइंटमेंट लेटर (Fake Appointment Letter) देऊन तरुणाची फसवणूक (Cheating Fraud Case) केल्याचा प्रकार समोर आला आहे. (Fake Documents)
याबाबत कोंढव्यातील ३७ वर्षाच्या तरुणाने कोंढवा पोलीस ठाण्यात (Kondhwa Police Station) फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी कृष्णा दत्तात्रय सुतार Krishna Dattatray Sutar (वय २८, रा. वर्क्रतुंड सोसायटी, बनकरनगर, धायरी) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार २०२२ ते आतापर्यंत घडला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि आरोपी यांची ओळख आहे. कृष्णा सुतार याने हडपसर येथील सिरम कंपनीत ओळख असल्याचे सांगितले. सिरम कंपनीमध्ये एच आर ह्युमन रिसोर्सेस या पदावर नोकरीला लावण्याचे आमिष दाखविले. त्यासाठी त्यांच्याकडून १ लाख ११ हजार रुपये घेतले. त्यांना सिरम कंपनीचे बनावट अपॉइंटमेंट लेटर तयार करुन दिले. फिर्यादी हे पत्र घेऊन सिरम कंपनीत गेले असता त्यांना ते बनावट असल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर त्यांनी सुतार याच्याकडे पैसे परत मागितले. त्याने पैसे न दिल्याने शेवटी त्यांनी फसवणूकीची तक्रार दिली असून सहायक पोलीस निरीक्षक उसगावकर तपास करीत आहेत.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा
https://www.instagram.com/policenamaa/?hl=en#
Sangli Accident News | दुचाकीला बिबट्या धडकल्याने जखमी व्यक्तीचा मृत्यू