Kondhwa Pune Crime | पुणे : कुत्रे अंगावर धावून आल्याने वाद, तरुणाला बांबू व रॉडने मारहाण

पुणे : Kondhwa Pune Crime | दुचाकीवरुन खडीमशीन येथे जात असताना कुत्रे अंगावर धावून गेले. यावरून दोघांमध्ये वाद झाले. याच वादातून पाच जणांच्या टोळक्याने एका तरुणाला शिवीगाळ करुन बांबू व रॉडने बेदम मारहाण करुन गंभीर जखमी केले. हा प्रकार शनिवारी रात्री 12 वाजता सिंहगड कॉलेज समोरील रोबोज पिझिरिया हॉटेलजवळ येवलेवाडी (Robo’s Pizzeria, Yewale Wadi Pune) रोड येथे घडला.

याबाबत सुरज सलीम शेख (वय 32, रा. गल्ली नंबर 3, अंतूलेनगर, येवलेवाडी कोंढवा बु.) यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात (Kondhwa Police Station) फिर्याद दिली आहे. त्यानुसार निलेश शेळके (वय 27, रा. अंतुलेनगर, कोंढवा बुद्रुक) आणि निलेश शेळके यांचे तीन अनोळखी साथीदारांच्या विरोधात आयपीसी 324, 504, 506, 34, 427 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सुरज हा त्याच्या इतर दोन मित्रांसोबत दुचाकीवरुन खडीमशीन येथे जात होता. त्यावेळी त्याच्या घराजवळील गल्ली नं.5 अंतुले नगर येथील निलेश शेळके याचे कुत्रे सुरज याच्या अंगावर धावून आले. त्यामुळे त्यांच्यात वाद झाले. त्यानंतर सुरज त्यांच्या मित्राला सोडण्यासाठी खडीमशीन चौकात जात असताना ते दोघे टिळेकरनगर येथील दुकानाजवळ थांबले. तेथून सुरज मित्राला सोडून रात्री बारा वाजता परत घरी येत असताना रोबोज पिझोरिया हॉटेल जवळ चहा पिण्यासाठी थांबला. त्या ठिकाणी आरोपी निलेश शेळके व त्याचे इतर तीन सहकारी थांबले होते.

निलेश शेळके सुरज जवळ आला व त्याने कुत्र्यावरुन झालेल्या भांडणाच्या कारणावरुन सुरज याची गचांडी पकडली.
तसेच त्याच्या हातातील मोबाईल घेऊन खाली आपटून नुकसान केले.
तर त्याच्या इतर तीन साथीदारांनी सुरजला शिवीगाळ करत रॉड व बांबूने मारहाण केली.
त्यावेळी आरोपी निलेश शेळके याने धारदार हत्याराने सुरजच्या पाठीवर व डोक्यावर वार करुन जखमी केले.
या भांडणात फिर्य़ादी यांच्या गळ्यातील पावणे चार तोळ्याची सोन्याची चैन तुटून गहाळ झाली.
हा गोंधळ सुरु असताना बघ्याची गर्दी वाढली होती.
त्यामुळे निलेश शेळके व त्याचे साथीदार गाडीवरून पळून गेले. अधिक तपास पोलीस करत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Sushma andhare | सुषमा अंधारे यांच्याविरूद्ध निवडणूक आयोगाकडे तक्रार, ‘त्या’ पत्रकार परिषदेतील छोट्या बाळाच्या उपस्थितीवर आक्षेप

Pimpri Chinchwad Crime Branch | पिंपरी : घरगुती गॅसचा काळाबाजार करणाऱ्यावर गुन्हे शाखेची कारवाई, सव्वा तीन लाखांचा मुद्देमाल जप्त