पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Kondhwa Rape Case | घरात घुसून एका विवाहित महिलेवर लैंगिक अत्याचार (Sexual Assault) केल्याची घटना बुधवारी (दि.17) रात्री पावणे बारा ते एकच्या दरम्यान कोंढवा परिसरात घडली. याप्रकरणी आरीफ नवाब खान Aarif Nawab Khan
(वय-20 रा. शिवनेरीनगर, कोंढवा खुर्द) याच्याविरुद्ध बलात्काराचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हा पीडित महिलेच्या पतीचा मित्र आहे.(Kondhwa Rape Case)
याबाबत 22 वर्षीय महिलेने शुक्रवारी (दि.19) कोंढवा पोलीस ठाण्यात (Kondhwa Police Station) फिर्याद दिली आहे. यावरुन पोलिसांनी आरीफ नवाब खान याच्यावर आयपीसी 376, 506 नुसार गुन्हा दाखल केला आहे.
आरोपीने महिलेला फोन करुन महत्त्वाचे बोलायचे आहे असे सांगितले. त्यानंतर तो महिलेच्या घरी गेला.
मी तुझ्यावर खुप प्रेम करतो, मी तुझ्यासोबत लग्न करतो, तुझ्या नवऱ्याने तुला सांभाळले नाही तर मी तुझा सांभाळ करतो
असे म्हणून महिलेसोबत जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला.
त्यावेळी महिलेने त्याला विरोध केला असता आरोपीने जबरदस्तीने शारीरिक संबंध (Physical Relation) प्रस्थापित केले.
तसेच याबाबत कोणाला काही सांगितले तर मुलाला जीवंत सोडणार नाही अशी धमकी दिल्याचे फिर्य़ादीत नमूद केले आहे.
पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक अनिल सुरवसे (API Anil Survase) करीत आहेत.
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
हे देखील वाचा
Supriya Sule | …ही आहे शरद पवारांची ताकद ! न्यूयॉर्क टाईम्सचा दाखला देत सुळे यांचा विरोधकांवर घणाघात