नगरसेवकांच्या प्रयत्नाने बसला नवीन ‘ट्रान्सफार्मर’, कोंढव्यातील नागरिकांची गैरसोय झाली दूर

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – वादळी वारे आणि पाऊस यामुळे कोंढवा खुर्द मिठानगर भागातील ट्रान्सफॉर्मरमध्ये बिघाड झाला होता. त्यामुळे कोंढव्यात सातत्याने वीज पुरवठा खंडीत होत होता.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका परविन हाजी फिरोज आणि ऑल कोंढवा सोशल फाऊंडेशनचे हाजी फिरोज शेख यांनी सातत्याने केलेल्या पाठपुराव्याला यश आले.

महावितरणने गल्ली नंबर १६ येथील बिघडलेला ट्रान्सफॉर्मर काढून त्या ठिकाणी नवीन ट्रान्सफॉर्मर बसविण्यात आला आहे. यावेळी लियाकत शेख, हुसेन भाई, लतीफ भाई, हनुमंता, संतोष, अमजद पठाण , शानवाज शेख , आबिद सैय्यद , झाकीर शेख आणि स्थानिक नागरिक उपस्थित होते.

हाजी फिरोज म्हणाले नवीन ट्रान्सफॉर्मरमुळे या भागातील वीज खंडीत होण्याच्या त्रासापासून नागरिकांची सुटका होणार आहे.