अभिमानास्पद ! भारताच्या हम्पीनं पटकावलं जागतिक ‘रॅपिड’ बुद्धिबळ स्पर्धेचे विजेतेपद

मॉस्को : वृत्तसंस्था – रशियातील मॉस्को येथे झालेल्या महिला जागतिक रॅपिड बुद्धिबळ स्पर्धेचे विजेतेपदावर भारताच्या कोनेरु हम्पीनं आपले नाव कोरले आहे. तिने चीनच्या टिंगजीचा टाय ब्रेकरमध्ये पराभव करत विजेतेपद पटकावले. महिला गटातील विजेतेपद हम्पीनं तर पुरुष गटातील विजेतेपद नॉर्वेच्या मॅग्नस कार्लसह याने पटकावले.

हम्पीचा पहिल्या फेरीमध्येच पराभव झाला. त्यानंतर दुसऱ्या फेरीत तिने मुसंडी मारत पुनरागमन केले. त्यानंतर झालेल्या 12 व्या फेरीपर्य़ंत हम्पीनं 9 गुण मिळवले. तीने टींगजीच्या गुणाची बरोबरी केली. हम्पी आणि टिंगजीचे गुण समान झाल्याने विजेतेपदाचा निर्णय आर्मेगेडोन गेम पद्धतीने करण्यात आला. अखेरच्या निर्णायक गेमसह हम्पीनं विजेतेपद पटकावले.

विजेतेपद पटकावल्याने प्रतिक्रीया देताना हम्मपी म्हणाली, हे माझे पहिलेच विश्वविजेते पद आहे. त्यामुळे या विजयामुळे खुप आनंदी आणि उत्साही आहे. पहिल्या फेरीत पराभव झाल्यानंतर दुसऱ्या फेरीमध्ये मला वापसी करता आली. दुसरी फेरीही अवघड होती पण त्यात मी विजयी झाले. अखेरच्या गेममध्ये माझी अवस्था चांगली होती. त्यामुळे मला सह विजय मिळवता आला.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/