Konkan Flood | पुरग्रस्तांना तुर्तास तातडीची 10 हजारांची मदत, पंचनाम्यानंतर मोठं ‘पॅकेज’

मुंबई न्यूज : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) –  कोकण (Konkan Flood) आणि पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार पावसामुळे पुरस्थिती निर्माण झाली होती. कोकण (Konkan Flood) आणि पश्चिम महाराष्ट्रातील पुरग्रस्तांना (flood victims) सावरण्यासाठी तातडीने 10 हजार रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. अनेक भाग हे अद्यापही पाण्याखाली आहेत. त्यामुळे पंचनामा (panchnama) करुन विशेष पॅकेजची (big package) घोषणा केली जाईल, अशी माहिती शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे (ekanath shinde) यांनी दिली. तसेच सर्व पंचानामे झाले तर 5 हजार कोटींपेक्षा अधिक नुकसानिचा अंदाज शिंदे यांनी यावेळी वर्तवला.

पाहणीनंतर विशेष पॅकेजची घोषणा

आज मंत्रिमंडळाची बैठक (Cabinet meeting) झाली. या बैठकीमध्ये पुरग्रस्तांना तातडीने मदत देण्यावर चर्चा झाली. यामुळे पुरग्रस्तांना तातडीने मदत म्हणून प्रत्येकाच्या खात्यात 10 हजार रुपये रोख मदत दिली जाणार आहे. अद्यापही अनेक गावांमध्ये पुराचे पाणी आहे. त्यामुळे या ठिकाणी पंचनामे करणे शक्य नाही. ज्या ठिकाणी पाणी आहे अशा ठिकाणी मदतकार्य सुरु आहे. या भागांची पाहणी केली जात आहे. पाहणी केल्यानंतर विशेष पॅकेजची घोषणा केली जाईल, असेही एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

वारसांना 50 लाखांची मदत

तसेच महापालिका (Municipal Corporation) आणि नगर परिषदेमध्ये जे कर्मचारी कोरोना काळात काम करत असताना मृत पावले आहेत. त्यांच्या वारसांना 50 लाखांची मदत देण्याची घोषणा करण्यात आली आहे.

 

तातडीची मदत सुरु

मागील काही दिवसांपासून राज्यात विशेषत: कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात अतिवृष्टी (Heavy rain) व पुरामुळे नैसर्गिक आपत्ती आली आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) आणि उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी निर्देश दिल्याप्रमाणे तातडीची मदत म्हणून SDRF
( राज्य आपत्ती प्रतिसाद निधी) मधील निकषांनुसार बाधितांना मदत सुरु करण्यात आली आहे.

15 दिवसात मदतीचा निर्णय

पूरग्रस्त भागातील अनेक ठिकाणी पुराचे पाणी आहे.
अद्याप ते ओसरले नसल्याने पंचानामे होऊ शकले नाहीत.
बाधितांचे पंचनामे सुरु असल्याने पुढील 15 दिवसांत वाढीव मदतीबाबतचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीसमोर आणावा, असे आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत ठरले आहे.
सध्या बाधित कुटुंबांना त्यांच्या घरातील साहित्य, कपडे, भांडी यांच्या नुकसानीसाठी SDRF च्या निकषानुसार तात्काळ मदत करणे सुरु असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली.

 

Web Title : Konkan Flood | immediate relief of rs 10000 to flood victims announcement of big package after panchnama

School Fees | शाळांच्या ‘फी’ मध्ये 15 टक्क्यांच्या कपातीस राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत मंजुरी

Modi government | मोदी सरकारचा ठेवीदारांसाठी दिलासा ! बँक बुडाली तरी 90 दिवसात ग्राहकाचे पैसे परत मिळणार

Dormant Account | बँकांकडे जमा 16,597 कोटी रुपयांना कुणीही नाही दावेदार, SBI कडे आहे सर्वात जास्त रक्कम; जाणून घ्या