कोकण-खेड युवाशक्तीतर्फे निसर्ग चक्रीवादळातील नुकसानग्रस्तांना आर्थिक मदत आणि अन्नधान्याच्या किटचं वाटप !

पोलीसनामा ऑनलाइन  – निसर्ग चक्रीवादळामध्ये नुकसान झालेल्या रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड येथील पानवली, जांभुलनगर,बौद्धवाडी, वेरलगाव, तोंडली, उनवरे गाव तसेच दापोली मधील पालगड या गावातील नुकसान झालेल्या ग्रामस्थांना कोकण खेड युवाशक्ती पिंपरी चिंचवड शहर यांच्यावतीने १०० कुटूंबाना अन्नधान्य किट व ४० कुटुंबांना रोख रक्कम रु २००० प्रति कूटुंब एवढी मदत सामाजिक भावनेतून करण्यात आली आहे.

या सर्व उपक्रमांमध्ये पुणे व पिंपरी चिंचवड शहरातील सर्व कोकणवासीय,उद्योजक, सामाजिक कार्यकर्ते व संस्था यांचा सहभाग होता. कोकण खेड युवाशक्ती संपूर्ण टीम यांनी अथक प्रयत्न करुन कोकणवासियांना एक मदतीचा हाथ या संकल्पनेतून देत आपले सामाजिक कर्तव्य पार पाडले आहे.