कोकण खेड युवाशक्ती पिंपरी चिंचवड शहर आयोजित कोरोनायोद्धा गौरव समारंभ व हळदी कुंकू समारंभ आनंदात साजरा

पोलिसनामा ऑनलाईन – कोकण खेड युवाशक्ती पिंपरी चिंचवड शहर आयोजित कोरोनायोद्धा गौरव समारंभ व हळदी कुंकू समारंभ आनंदात पार पडला. या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती विजया सुतार(नगरसेविका पिं चिं मनपा) अश्विनी जाधव(नगरसेविका पुणे मनपा), परेश मोरे सर (पुणे माथाडी हमाल कामगार मंडळ सदस्य महाराष्ट्र शासन), अशोक कदम (अध्यक्ष ‌अठरागाव रहिवासी विकास संस्था) राम सकपाळ (अध्यक्ष संबधित मराठा कोकणवासीय समाज पुणे), राम उत्तेकर (अध्यक्ष पंधरागाव कोकण विकास सेवा ट्रस्ट), रूपेश कदम (माजी अध्यक्ष कोकण खेड युवाशक्ती), गजानन मोरे (युवक अध्यक्ष कोकण विकास महासंघ), उद्योजक मनोहर यादव, उपाध्यक्ष संदिप साळुंखे, अभिजीत कदम व मान्यवर पाहुणे उपस्थित होते.
image.png

कार्यक्रमात आरोग्य, पोलिस, शासकीय व इतर विभागातील ज्यांनी कोरोनाच्या काळात जीवाची बाजी लावुन सेवा केली त्यांना कोरोना योद्धा म्हणुन ट्रॉफी, सन्मानपत्र, नारळ, शॉल देऊन गौरवण्यांत आले. तसेच महिलांनी एकत्र येऊन त्यांना व्यासपीठ मिळावे व महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी हळदी कुंकंवाचे आयोजन करण्यात आले होते. सर्व मान्यवर, उपस्थितीत बांधवांनी कोकण खेड युवाशक्तीच्या आतापर्यंत केलेल्या कार्याचे भरभरून कौतुक करून खूप खूप शुभेच्छा दिल्या. तसेच युवाशक्ती भविष्यांत देखील सामाजिक, शैक्षणिक, कला, क्रिडा व इतर समस्या सोडवण्यासाठी अग्रगण्य राहिल अशी युवाशक्तीचे अध्यक्ष संजय मोरे यांनी ग्वाही दिली.
image.png

त्याचप्रमाणे कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी कोकण खेड युवाशक्तीचे सर्व पदाधिकारी, सभासद यांचे मोलाचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन निवेदक अक्षय मोरे यांनी केले व आभार प्रदर्शन कार्याध्यक्ष प्रा.संदिप कदम सर यांनी केले.