Konkan Railway | कोकण रेल्वेचा प्रवास होणार ‘सुपरफास्ट’

रत्नागिरी न्यूज : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) –  Konkan Railway । कोरोनाच्या (Corona) महामारीत रेल्वे गाड्या बंद करण्यात आल्या होत्या. यामुळे प्रवाशांना अडथळा निर्माण झाला होता. मात्र परिस्थिती आटोक्यात आल्याने काही प्रमाणात रेल्वे सुरु केल्या आहेत. असे असताना मात्र रेल्वे महामार्गावरील (railway highway) कामे देखील थांबले होते. रोहा ते वीर (Roha To Veer) या मार्गाच्या थांबलेल्या कामाचे दुपदरीकरण पुढील 4 महिन्यात पूर्ण होणार आहे. तसेच, क्रॉसिंग स्थानक (crossing station) प्रकल्प देखील पूर्ण झाल्याने प्रवास वेगवान आणि सुरळीत होणार असल्याचं कोकण रेल्वेकडून (Konkan Railway) सांगण्यात आलं आहे. konkan railway travel fast roha to veer road work completed

कोरोनामुळे रेल्वेची चाके थांबली होती. मात्र त्याला आता काही प्रमाणात गती मिळाली आहे.
परंतु कोकण आणि त्यामार्गे जाणाऱ्‍यांची संख्या जास्त आहे.
तसेच, मालवाहतूक देखील मोठया प्रमाणात होते. या काळात सध्या प्रवाशांची संख्या अधिक असल्याने गर्दी प्रचंड होते.
दुसरी गोष्ट म्हणजे, गर्दीची संख्या पाहता जादा संख्येने गाड्या सोडल्यास कोकण मार्गावरील वाहतुकीची कोंडी होते.
म्हणून कोकण मार्गावरील प्रवास सुकर आणि सुरळीत करण्यासाठी रोहा ते ठोकूर असे 700 किलोमीटर मार्गाचे दुपदरीकरण करण्याचा मोठा निर्णय कोकण रेल्वेने (Konkan Railway) घेतला होता.
मात्र, अनेक अडचणी पाहता रोहा ते वीर या 46 किलोमीटरचे काम पूर्ण करण्याचे काम सध्या हाती घेण्यात आले आहे.

रोहा ते वीर (Roha To Veer) या 46 किलोमीटरचे काम आता अंतिम टप्यात आले आहेत.
95 टक्के काम पूर्ण झाले असून उर्वरित कामे 4 महिन्यात पूर्ण होणार असल्याचा विश्वास अधिकाऱ्याने व्यक्त केला आहे. दरम्यान, याबरोबरच एकमेकांना पटरी ज्या ठिकाणी क्रॉस होतात.
त्या ठिकाणी क्रॉसिंग स्थानक (crossing station) प्रकल्पाचे काम देखील पूर्ण झालं आहे.
तर यातून 8 नवे स्थानके होणार आहेत.
इनजे, खारेपाटण, सापे वामाने, निळजे, कडवई, कालबनी, अर्चिणे, वेरवली ही नवीन स्थानके सेवेत येणार आहेत.

‘या प्रकल्पाचा खर्च 202 कोटी –

‘या प्रकल्पाचा खर्च 202 कोटी रुपये आहे. यात रुळांच्या जोडणीपासून बरीच कामे करण्यात आली आहेत. एखाद्या ठिकाणी रुळ हे एकमेकांना छेदत असतील तर अशा ठिकाणी 2 लांब पल्ल्याच्या गाडया एकमेकांना ओलांडून जाऊ शकत नाहीत. म्हणून, वेळ वाया जातो.
हा वेळ वाचावा आणि दोन्ही गाड्यांना मार्ग मोकळा मिळण्यासाठी क्रॉसिंग स्थानक प्रकल्प हाती घेतला आहे.

Web Title : konkan railway travel fast roha to veer road work completed

Join our Whatsapp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

Gold Price Today | गोल्डच्या दरात आजसुद्धा नोंदली गेली तेजी, चांदीची चमक परतली, पहा आजचे बंद भाव

Ration Card | रेशन कार्ड काढायचे आहे का? तर अतिशय आवश्यक आहेत ‘ही’ कागदपत्रे, जाणून घ्या अर्जाची प्रक्रिया

ICICI Bank सह 3 बँकांनी सुरू केली नवीन सुविधा ! आता केवळ मोबाइल नंबरवरून पाठवू शकता 1 लाख रुपये, जाणून घ्या कसे