Coronavirus : कोकणात चाकरमान्यांच्या स्वागतासाठी स्वखर्चातून उभारले ’क्वारंटाईन होम’

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   कोरोनाच्या काळात सध्या कोकणातील गावकर्‍यांनी शहरातून येणार्‍या चाकरमान्यांसाठी स्वखर्चातून क्वारंटाईन होम उभारले आहे. त्यामुळे त्यांच्या कृतीचे कौतुक केले जात आहे. अनेक गावांनी चाकरमान्यांना गावी येण्याकरता विरोध दर्शवल्याने वाद झाले होते. पण, अशा वेळी देखील कोकणातील काही गावांनी चाकरमान्यांचे स्वागत करत त्यांच्यामध्ये आपलेपणाची भावना रूजवत आम्ही तुमच्यासोबत आहोत हा विश्वास दिला आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील तेर्‍हे! सह्याद्रीच्या कुशीत वसलेले हे गाव आणि चाकरमान्यांच्या स्वागतासाठी त्यांनी राबवलेला पॅटर्न सर्वत्र चर्चेचा विषय ठरत आहे.

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव हा मुंबईस्थित कोकणवाल्यांसाठी चिंता वाढवणारा असल्यामुळे चाकरमानी गावाकडे येऊ लागले. चालत, पास काढून त्यांनी गाव जवळ करण्याचा निर्णय घेतला. पण, अनेक गावांमध्ये त्यांना विरोध झाला, पण, काही गावांनी त्याचे स्वागत केले. त्यासाठी गाव पातळीवर मॉडेल देखील तयार करण्यात आले. तेर्‍हे गावाने देखील याकरता पुढाकार घेउन मे महिन्यापासून तशी तयारी केली. त्यासाठी गावचे सरपंच संदीप भुरवणे यांनी पुढाकार घेतला आहे. ”गावात चाकरमान्यांना विरोध झाला असा नाही. पण, सरपंच म्हणून माझी जबाबदारी सांभाळली. गावच्या लोकांना मुंबई, पुणे येथील परिस्थिती काय आहे याची जाणीव करून दिली. लोकांमधील गैरसमज दूर केले. त्यानंतर गावात वस्तीपासून दूर तात्पुरती शेड उभारत लोकांची राहण्याची सोय करण्यात आली. यावेळी सार्‍या गोष्टी श्रमदानातून आणि प्रत्येकाने आपल्या खिशातील पैसे खर्च करत उभारल्या. इथे राहणार्‍यांना कोणतीही कमी पडणार नाही याची काळजी घेतली.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like