Tandav Controversy : सुप्रीम कोर्टाच्या ‘त्या’ निर्णयावर कोंकणा सेन शर्माची टीका ! म्हणाली…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूड ॲक्टर सैफ अली खान (Saif Ali Khan) आणि ॲक्ट्रेस डिंपल कपाडिया (Dimple Kapadia) यांची तांडव (Tandav) या ॲमेझॉन प्राईमवरील वेब सीरिजमुळं नवा वाद सुरू झाला आहे. भगवान शंकराचा अपमान करत हिंदुंच्या भावना दुखावल्याचा आरोप या सीरिजवर होत आहे. सध्या ही सीरिज बॅन करण्याची मागणी सुरू आहे. सीरिजचे मेकर्स आणि कलाकारांविरोधात एफआयआर दाखल झाली आहे. वादानंतर मेकर्सनी माफीही मागितली आहे. तरीही यावरील वाद सुरूच आहे. आता एकूण 6 शहरांमध्ये सीरिज विरोधात FIR दाखल झाल्यानंतर युपीचे लखनऊ पोलीस मेकर्सची चौकशी करण्यासाठी मुंबईत दाखल झाले होते. इतकंच नाही तर विविध राज्यात दाखल झालेल्या तक्रारी रद्द करण्यासाठी डायरेक्टर अली अब्बास जफर यांनी याचिकाही दाखल केली होती. सुप्रीम कोर्टात दि 27 जानेवारी 2021 रोजी (वार- बुधवार) यावर सुनावणी झाली.

सुप्रीम कोर्टानं राज्यात दाखल असलेल्या एफआयआरवर स्थगिती देण्यास नकार दिला. वेब सीरिज तांडवचे निर्माता, लेखक, अभिनेता यांच्या विरोधात देशभरात दाखल एफआयआर क्लब करण्याबाबत सुप्रीम कोर्टानं नोटीस जारी केली. सोबतच अंतरिम प्रोटेक्शन देण्यास नकार दिला. कोर्टानं अटकेवर स्थगिती देण्याचा आदेश देण्यास नकार दिला. यानंतर अनेक लोकांसहित सेलेब्सच्याही अनेक प्रतिक्रिया समोर येताना दिसल्या. बॉलिवूड ॲक्ट्रेस कोंकणा सेन शर्मा (Konkona Sen Sharma) हिंनही यावर भाष्य करत ट्विट केलं आहे जे सध्या खूप चर्चेत आहे.

कोंकणानं तिच्या ट्विटरवरून एक पोस्ट शेअर केली आहे. यात तिनं सुप्रीम कोर्टानं तांडवच्या टीमला फटकारण्यावरून टीका केली आहे. कोंकणानं तिच्या ट्विटमध्ये लिहिलं की, जेवढे लोक शोमध्ये इन्वॉल्व असतात ते सर्व स्क्रिप्ट वाचतात. नंतर कॉन्ट्रॅक्ट साईन करतात. मग साऱ्या कास्ट आणि क्रू ला अरेस्ट करणार का ?

कोंकणाचं हे ट्विट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. अनेकांनी यावर कमेंट करत प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींनी हे ट्विट शेअर देखील केलं आहे. सध्या सोशल मीडियावर तिच्या ट्विटची खूप चर्चा सुरू आहे.

कोंकणाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर 2005 साली कोंकणानं मधुर भांडारकर यांच्या पेज 3 या हिंदी सिनेमात काम केलं. या सिनेमात तिचा लिड रोल होता. हा सिनेमा राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित झाला. कोंकणानं मिस्टर अँड मिसेस अय्यर या इंग्रजी सिनेमातही काम केलं आहे. यासाठी तिला बेस्ट ॲक्ट्रेसचा नॅशनल अवॉर्डही मिळाला आहे. खास बात अशी की, हा सिनेमा तिची आई अपर्णानं दिग्दर्शित केला होता.