कोपर्डी खटला : औरंगाबाद खंडपीठाकडून मुंबईत मुख्य न्यायमूर्तींकडे वर्ग

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – कोपर्डी अत्याचार व हत्याकांड प्रकरणातील तीनही नराधमांना अमदनगर न्यायालयाकडून फाशीची शिक्षा ठोठावण्यात आलेली आहे. फाशीच्या शिक्षेबाबत मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाकडे दाखल कन्फर्मेशन याचिकेवर औरंगाबाद खंडपीठात सुनावणी सुरू होती. हा खटला मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्तींकडे वर्ग करण्यात आला आहे.

कर्जत तालुक्यातील कोपर्डी येथील अल्पवयीन मुलीवर अमानुष अत्याचार करून तिचा निर्घृण खून करण्यात आला होता. या गुन्ह्यात तीन जणांना फाशीची शिक्षा जिल्हा सत्र न्यायालयाने ठोठावली आहे. फाशीच्या शिक्षेची कन्फर्मेशन याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे.

या खटल्याची सुनावणी औरंगाबाद खंडपीठ मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तींकडे वर्ग केली आहे. या खटल्यात सरकारी पक्षाच्यावतीने विशेष सरकारी वकील म्हणून उमेशचन्द्र यादव पाटील हे काम पाहत आहे. या खटल्यात कन्फर्मेशन याचिकेवर सुनावणी होऊन त्यावर लवकर निर्णय होण्याची अपेक्षा आहे. या खटल्याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

Visit : Policenama.com