कोपरगाव : कोळपेवाडी बलात्कार प्रकरणातील अत्याचार करणाऱ्यास अटक

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी येथे अल्पवयीन
मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. स्थानिक गुन्हे शाखेने नाशिक जिल्ह्यातील त्याला आज रात्री पकडले.

अमोल अशोक निमसे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत माहिती अशी की, कोळपेवाडी येथे काही दिवसांपूर्वी अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार झाला होता. याप्रकरणातील आरोपी फरार होता. आरोपींचे फोटोपोलिसांनी प्रसिद्ध करून आरोपीबाबत माहिती मिळाल्यास पाठवण्याचे आवाहन केले होते.

कोपरगाव तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेमधील तपास
पथकातील सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांनी 5 दिवस मेहनत घेतली. आरोपीच्या शोधासाठी पथके
पाठवण्यात आली होती. अखेर आरोपी अमोल अशोक निमसे याला अटक करण्यात पोलिसांना यश
आले आहे. त्याच्या दोन साथीदारांचा शोध सुरू आहे.

फरार झालेल्या आरोपींचा पाच दिवसांपासून पोलीस शोध घेत होते. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांच्या आदेशावरून दोन पथके आरोपींचा शोध घेत होते. या पथकाला आरोपी नाशिक जिल्ह्यातील सिन्नर परिसरात असल्याची माहिती मिळाली होती. त्यावरून आज रात्री पथकाने आरोपीला अटक केली आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/