Kopargaon Highway Accident | कोपरगाव महामार्गावर कंटेनरची रिक्षाला धडक ! 6 प्रवाशांचा जागीच मृत्यु तर दोघे गंभीर जखमी

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – Kopargaon Highway Accident | कोपरगाव महामार्गावर पगारे वस्तीनजीक भीषण अपघात (Kopargaon Highway Accident) झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. कंटेनरने (Container) ॲपेरिक्षाला (Rickshaw) दिलेल्या जोराच्या धडकेत 6 जणांचा जागीच मृत्यू (6 Died on The Spot) झाला आहे. तर, दोन जण गंभीर जखमी (Seriously injured) झालेत. ही घटना आज (शुक्रवार) सकाळी 8 वाजेच्या सुमारास घडली. कंटेनरने धडक दिल्याने ॲपेरिक्षाचा पूर्णपणे चक्काचूर झाला. या अपघातात 2 कॉलेजमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थिनीचाही मृत्यू (Died) झाला आहे.

 

राजाबाई साहेबराव खरात (Rajabai Sahebrao Kharat) (वय 60, रा. चांदेकसारे, ता. कोपरगाव), आत्माराम जमानसा नाकोडे (Atmaram Jamansa Nakode) (वय 65 रा. वावी ता. सिन्नर), पूजा नानासाहेब गायकवाड (Pooja Nanasaheb Gaikwad) (वय 20, रा. हिंगणवेढे), प्रगती मधुकर होन (Pragati Madhukar Hon) (वय 20 रा. चांदेकसारे ता. कोपरगाव), शैला शिवाजी खरात (Shaila Shivaji Kharat) (वय 42), शिवाजी मारुती खरात (Shivaji Maruti Kharat) (वय 52) (दोघेही रा. श्रीरामपूर) अशी अपघाती मृत्यु झालेल्यांची नावे आहेत. (Kopargaon Highway Accident)

 

झगडेफाट्यावरून ॲपेरिक्षा पॅसेंजर घेऊन कोपरगावकडे जात असताना, पगारे वस्तीजवळ कोपरगावहुन येत असलेल्या कंटेनरने जोरात धडक दिली आहे.
या भीषण अपघातात ॲपेरिक्षातील 6 प्रवाशांचा जागीच मृत्यु झाला आहे. दोन जण गंभीर जखमी झाले आहेत.
त्यांना उपचारासाठी राष्ट्रसंत जनार्दन स्वामी रुग्णालयात (Rashtrasant Janardan Swamy Hospital) दाखल करण्यात आले आहे.

 

Web Title :- Kopargaon Highway Accident | Container rickshaw hit on Kopargaon highway 6 passengers died on the spot and two were seriously injured

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा