कोरेगाव पार्क परिसरातील जी-रेसीडेन्सी हॉटेलमधील हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – कोरेगाव पार्क परिसरातील जी. रेसीडेन्सी हॉटेलमध्ये छापा घालून कोरेगाव पार्क पोलिसांनी सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी येथून मुंब्र्यातील एका तरुणीची सुटका केली असून त्यांना देहविक्री करण्यास भाग पाडणाऱ्या दोन एजंटांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तर दलाल अलोक, आर्यन मेहता, गोरख शर्मा अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत.

कोरेगाव पार्क भागातील जी. रेसीडेन्सी या हॉटेलमध्ये अलोक नावाचा दलाल आणि त्याचे साथीदार तरुणींचे फोटो पाठवून ग्राहक ठरवितात. त्यानंतर त्याचे पैसे घेऊन तरुणींकडून देह विक्री करून घेतात. अशी माहिती पोलीस हवालदार दिनेश शिंदे यांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवून खात्री केली आणि हॉटेल वर छापा टाकला. त्यावेळी पोलिसांनी तेथून ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा भागातील तरुणीची सुटका केली. तिला महंमदवाडी येथील निरीक्षण गृहात पाठविण्यात आले आहे. संबंधित तरुणी ही गरीब घरातील असून तिच्याकडून पैशांच्या अमिषाने जबरदस्तीने दोघे दलाल देहविक्री करून घेत असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यानंतर दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस उपायुक्त बच्चन सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक मदन बहाद्दरपुरे, गुन्हे शाखेचे निरीक्षक गणेश माने आणि पथकाने केली.

You might also like