कोरियन तरुणींच्या सुंदर केसांचे काय आहे रहस्य ? कशा प्रकारे घेतात ‘त्या’ काळजी, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्थ – जगात कोरियन ब्युटी किंवा के-ब्युटीचा ट्रेंड प्रचंड वाढला आहे. कोरियन तरुणींच्या सुंदरतेचं रहस्य आता संपूर्ण जगाला माहीत होत आहे. या तरुणीच्या सुंदर त्वचेचे आणि त्यांच्या सौदर्याचं गुपीत आता कोणापासूनही लपून राहिलेलं नाही. कोरियन तरुणी आपल्या त्वचेची काळजी घेण्यासाठी ज्या 10 स्टेप्स फॉलो करतात, त्याच प्रकारे या तरुणी केसांची योग्य पद्धतीने देखभाल करतात. जाणून घेऊयात या तरुणींच्या चमकदार आणि काळ्या सुंदर केसांचे रहस्य.

ऑर्गन ऑइलनं मसाज
ऑर्गन ऑइल हे त्यांच्या हेअर केअर हे त्यांच्या सुंदर केसांच मोठं गुपीत आहे. मागील वर्षापासून या ऑइलची लोकांमध्ये प्रचंड क्रेझ दिसत आहे. या तेलामुळे केसांना नैसर्गिक मॉइश्चराइझर मिळतं. शिवाय केस चमकदार दिसू लागतात. ज्या प्रमाणे आपल्या त्वचेला प्रत्येक दिवशी विशेष देखभालीची आवश्यकता असते. त्याच प्रमाणे केसांचीही दुप्पट काळजी घेणे आवश्यक आहे. प्रदूषण, धूळ, माती आणि बदलत्या हवामानामुळे आपल्या केसांवर वाईट परिणाम होतात. यामुळे केसगळती, केस तुटणे आणि कोंड्याची समस्या उद्भवते. या समस्या दूर करण्यासाठी आर्गन ऑइलने आपल्या केसांची मसाज करा.

सूर्यकिरणांपासून केसांचा बचाव
कोरियन तरुणी सूर्याच्या हानिकारक किरणांपासून त्वचा आणि केसांची बचाव करण्यासाठी कोणतीही कसर सोडत नाहीत. सूर्याच्या अतिनिल किरणांपासून केस आणि त्वचेचे नुकसान होते. हे नुकसान टाळण्यासाठी नेहमी त्यांच्या डोक्यावर स्कार्फ किंवा कॅप दिसते. सूर्याच्या घातक किरणांमुळे केसांच्या नैसर्गिक रंगावर वाईट परिणाम होतो.

केसांची तेल मसाज
टाळूचा मसाज करणं ही स्टेप त्यांच्या हेअर केअर रुटीनमधील सर्वात महत्त्वपूर्ण स्टेप आहे. जेवढ्या जास्त प्रमाणात कोसांची मसाज केली जाईल, तितक्या चांगल्या पद्धतीने केसांची वाढ होते आणि केस मजबूत होतात. मसाज केल्याने टाळूच्या भागातील रक्ताभिसरण प्रक्रिया सुधारते. यामुळे केसांची वाढ होण्यास मदत होते.

व्हिनेगरनं केस धुणे
केस धुण्यासाठी व्हिनेगरचा वापर करणं ही त्यांच्या रुटीनमधील महत्त्वपूर्ण क्रिया मानली जाते यासाठी एका मगमध्ये पाणी आणि व्हिनेगर मिक्स करा. या पाण्याने आपले केस स्वच्छ धुऊन घ्या. असे केल्याने केस आणि टाळूचा पीएच स्तर संतुलित राहतो. ज्यामुळे टाळूच्या त्वचेमध्ये ओलावा टिकून राहण्यास मदत मिळते.

हेअर केअर मास्क
केस तेलकट झाल्यास कोरियन तरुणी आपल्या केसांसाठी अंड्याचे मास्क वापरतात. या मास्कमध्ये अंड्यातील केवळ पांढऱ्या भागाचा वापर केला जातो. या मास्कमुळे टाळूची त्वचा योग्य पद्धतीनं स्वच्छ होते आणि तेलकटपणाही कमी होतो.