Koregaon Bhima Case | कोरेगाव भीमा चौकशी आयोगास पुन्हा मुदतवाढ; 31 डिसेंबर 2021 पर्यंत वाढवली मुदत

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – कोरेगाव भीमा प्रकरणाची (Koregaon Bhima Case) चौकशी करण्यासाठी चौकशी आयोग (Inquiry Commission) गठीत करण्यात आला आहे. चौकशी आयोगाला कोरेगाव भीमा प्रकरणाची (Koregaon Bhima Case) चौकशी करण्यासाठी 31 मार्च 2021 पर्यंत मुदतवाढ (deadline) देण्यात आली होती. परंतु कोविडच्या (COVID-19) प्रादुर्भावामुळे चौकशी होऊ शकली नाही. त्यामुळे चौकशी आयोगाला 31 डिसेंबर 2021 पर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय गृह विभागाने घेतला आहे.

कोरेगाव भीमा घटनेची चौकशी करण्यासाठी शासनाने कलकत्ता उच्च न्यायालयाचे (Calcutta High Court) सेवानिवृत्त मुख्य न्यायाधीश जयनारायण पटेल (Jayanarayana Patel) यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी आयोग गठीत केला आहे. या आयोगाला 31 मार्च 2021 पर्यंत चौकशी करण्याची मुदत दिली होती. मात्र मार्च 2020 पासून राज्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर टाळेबंदी (lockdown) लागू करण्यात आली. यामुळे आयोगाला सुनावणी घेण्यास अडचण येत होती.

आयोगाचे काही कर्मचारी हे ज्येष्ठ नागरिक आहेत. त्यांच्या आरोग्याचा दृष्टीने जोखीमीचे ठरले असते.
याशिवाय सुनावणीसाठी येणारे साक्षीदार व वकीलांना देखील जोखमीचे ठरणार होते. त्यामुळे
आयोगाचे काम बंद ठेवण्यात आले होते. त्यामुळे आयोगाला आणखी मुदतवाढ देण्याबाबत सरकार
विचार करत होते. यामुळे आता आयोगाला 31 डिसेंबर 2021 पर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय गृह
विभागाने घेतला आहे. 31 डिसेंबर 2021 पर्यंत आयोगाने कामकाज पूर्ण करुन सरकारला अंतिम अहवाल सादर करावा असे गृह विभागाच्या शासन निर्णयात नमूद केले आहे.

हे देखील वाचा

Raj Kundra | राज कुंद्राने दीड वर्षात 100 पेक्षा अधिक पॉर्न मुव्हीज तयार करून कमावले कोट्यवधी रुपये

Raigad Landslides | रायगड जिल्हयात दरड कोसळून 36 जणांचा मृत्यू, ढिगार्‍याखाली 30 हून अधिकजण अडकल्याची भीती – जिल्हाधिकारी निधी चौधरी


ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  Koregaon Bhima Case | Koregaon Bhima Commission of Inquiry extended again; Deadline extended to 31 December 2021

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update