Koregaon Bhima Case | कोरेगाव भीमा प्रकरणात संभाजी भिडेंना जयंत पाटील यांच्यामुळे ‘क्लिनचिट’, प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणातील (Koregaon Bhima Case) दोषारोपपत्रातून (Charge Sheet) सबळ पुरावे न मिळाल्याने शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे (Founder of Shiv Pratishthan Sambhaji Bhide) यांचे नाव वगळण्यात आले. यावरुन वंचित बहुनज आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर (Vanchit Bahujan Aghadi Chief Prakash Ambedkar) यांनी राष्ट्रवादीचे (NCP) नेते जयंत पाटील (Jayant Patil) यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. कोरेगाव भीमा प्रकरणात (Koregaon Bhima Case) संभाजी भीडे यांना जयंत पाटील यांच्यामुळे क्लिनचिट (Clean Chit) मिळाली असा आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.

 

प्रकाश आंबेडकर यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले, ज्या तपास अधिकाऱ्याने (Investigating Officer) हे क्लीनचिट दिले आहे, त्याने सुप्रीम कोर्टात (Supreme Court) दिलेले प्रतिज्ञापत्र (Affidavit) वाचलेले नाही. त्यात सुप्रीम कोर्टाला कसे कळवले आहे की, संभाजी भिडे आणि एकबोटे दोषी आहेत. त्यामुळे तपास अधिकाऱ्याने कोणाच्या तरी सांगण्यावरुन क्लीनचिट दिली आहे. तपास अधिकाऱ्याने सुप्रीम कोर्टात जे प्रतिज्ञापत्र दिले आहे. त्यामध्ये भिडेंना दोषी ठरवले आहे. आता भूमिका बदलली तर तो तपास अधिकारीच विटनेस बॉक्समध्ये येईल. त्या अधिकाऱ्याला ग्रामीण पोलिसांनी (Pune Rural police) सुप्रीम कोर्टात दिलेल्या प्रतिज्ञापत्राचा सामना करावा लागेल, असे त्यांनी म्हटले आहे. (Koregaon Bhima Case)

 

यावेळी बोलताना प्रकाश आंबेडकर यांनी राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांच्यावर गंभीर आरोप केले. जयंत पाटील हे संभाजी भिडे यांच्या पाया पडतानाचे छायाचित्र आहे. त्यामुळे लक्षात घेतले जावे की सूत्रं कुठून हलत असतील. तर हा सगळा घोटाळा आहे आणि याची कागदपत्रे माझ्याकडे आहेत, असे शरद पवार (Sharad Pawar) यांनी म्हटले होते. यानिमित्ताने राष्ट्रवादीमधील दुफळी बाहेर येत असल्याचे आंबेडकर यांनी म्हटले.

 

भाजपचाही रोल आहे

ते पुढे म्हणाले, भाजपचा (BJP) देखील यामध्ये पूर्ण रोल आहे.
इथल्या कुठल्याही यशस्वीपणे सत्ता राबवायची असेल तर ज्या टेररिस्ट ऑर्गनायझेशन (Terrorist organization) आहेत त्यांचा परिचय पोलिसांना करुन दिला पाहिजे.
नाशिकमधील पोलीस प्रशिक्षण केंद्रात (Police Training Center Nashik) पोलीस अधिकाऱ्यांना
एक ठराविक विचारसरणीचे लोकच दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी असतात असे शिकवले जाते.
दुसऱ्या बाजूंच्या लोकांबद्दल ते बोलत नाही, असेही आंबेडकर म्हणाले.

 

Web Title :- Koregaon Bhima Case | NCP leader jayant patils clean chit to sambhaji bhide in koregaon bhima case prakash ambedkar

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा