Koregaon Bhima | कोरेगाव भिमासाठी 5000 पोलिसांचा बंदोबस्त

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कोरेगाव भिमा (Koregaon Bhima) येथील विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी 1 जानेवारी रोजी राज्यभरातून हजारो भाविक येत असतात. या पार्श्वभूमीवर या परिसरात कायदा व सुव्यवस्था (Law and order) राखण्यासाठी पुणे शहर पोलीस (Pune City Police) दलाने कोरेगाव भिमा (Koregaon Bhima) येथे 5 हजार पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त लावला आहे. यासाठी राज्यभरातील वेगवेगळ्या पोलीस आयुक्तलय (Police Commissionerate) व अधिक्षक कार्यालयातूनही 700 हून अधिक पोलीस अधिकारी व कर्मचारी यांचा बंदोबस्त मागविण्यात आला आहे.

 

कोरेगाव भिमा (Koregaon Bhima) येथील बंदोबस्तासाठी आज सायंकाळी राज्याच्या विविध भागातून पोलीस पुण्यात झाले आहेत. उद्या सकाळी सर्व पोलिसांना बंदोबस्ताची माहिती देण्यात येणार आहे. तसेच रंगीत तालीम घेतली जाणार आहे. 31 डिसेंबरला सायंकाळपासून हा बंदोबस्त सुरु होणार असून तो 1 जानेवारी रोजी रात्री उशिरापर्यंत राहणार असल्याची माहिती विशेष शाखेच्या पोलीस उपायुक्त भाग्यश्री नवटके (Special Branch DCP Bhagyashree Navatke) यांनी दिली.

असा आहे पोलीस बंदोबस्त
2 अपर पोलीस आयुक्त (Addi CP), 5 पोलीस उपायुक्त, 13 सहायक पोलीस आयुक्त (ACP), 53 पोलीस निरीक्षक (Police Inspector), 130 सहायक निरीक्षक (API)/उपनिरीक्षक (PSI), 1950 अंमलदार, 700 होमगार्ड, राज्य राखीव दलाच्या 4 कंपन्या, 10 बॉम्ब शोधक व नाशक पथक (Bomb Squad), 6 जलद कृती दलाची पथके, 5 दंगल नियंत्रण पथके (Riot Control Squad) असा पुणे शहर पोलीस दलाचा बंदोबस्त आहे.

 

राज्यातून इतर ठिकाणावरुन आलेले पोलीस
याशिवाय मुंबई, नवी मुंबई, सीआयडी क्राईम, महामार्ग पोलीस, पुणे, मुंबई रेल्वे पोलीस,
औरंगाबाद, पिंपरी, औरंगाबाद आयुक्तालय, नाशिक, पालघर, रायगड येथून 2 पोलीस उपायुक्त,
5 सहायक पोलीस आयुक्त, 20 पोलीस निरीक्षक, 700 पोलीस अंमलदार असा बंदोबस्त आला आहे.

 

 

Web Title :- Koregaon Bhima | five thousand pune police for koregaon bhima 1st january bandobast

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Omicron Covid Variant | गेल्या 24 तासात ओमिक्रॉन व्हेरिएंटचे 190 नवीन रुग्ण ! राज्यात 450 पैकी 125 रुग्णांनी ओमिक्रॉनवर मात, जाणून घ्या आकडेवारी

 

Omicron Covid Variant | नायजेरियाहून पुण्यात आलेल्या ओमिक्रॉन बाधित रुग्णाचा मृत्यू, पण मृत्यूमागील कारण वेगळं

 

Mayor Murlidhar Mohol | 15 ते 18 वयोगटासाठी पुणे शहरात 5 लसीकरण केंद्रे, महापौर मुरलीधर मोहोळ यांची माहिती