Koregaon Bhima Inquiry Commission | IPS अधिकारी विश्वास नांगरे पाटील यांनी सादर केले कोरेगाव भीमा चौकशी आयोगाला प्रतिज्ञापत्र; जाणून घ्या नेमकं काय त्यामध्ये

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Koregaon Bhima Inquiry Commission | कोरेगाव भीमा येथे 1 जानेवारी 2018 रोजी झालेल्या दंगलीच्या (Violence In Koregaon Bhima) वेळी कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक (Special Inspector General Of Police, Kolhapur Range) व सध्याचे मुंबईचे सह आयुक्त (कायदा व सुव्यवस्था) joint Commissioner (law and order) Of Mumbai Police विश्वास नांगरे – पाटील (IPS Officer Nangare Patil) यांनी कोरेगाव भीमा चौकशी आयोगासमोर (Koregaon Bhima Inquiry Commission) शुक्रवारी प्रतिज्ञापत्र (Affidavit) सादर केले आहे.

 

कोरेगाव भीमा येथील लढाईला 200 वर्षे होत असल्याच्या निमित्ताने मोठ्या प्रमाणावर नागरिक येणार असल्याने तेथे विशेष बंदोबस्त (Special Bandobast) लावण्यात आल्याचे त्यांनी प्रतिज्ञापत्रात सांगितले.
पेरणे गावातील (Parne Gaon) जयस्तंभ (Jaystambh) येथे होणारा मेळावा लक्षात घेऊन अतिरिक्त पोलीस दल (Additional Police Force) आणि एस आर पी एफ कंपन्यांना Maha SRPF (Maharashtra State Reserve Police Force तैनात करण्याचे आदेश दिले होते.

 

विश्वास नांगरे पाटील यांनी 1 जानेवारी 2018 रोजी आणि त्यापूर्वी कोरेगाव भीमा येथील बंदोबस्ताच्या संदर्भात त्यांच्या आणि इतर पोलीस अधिकार्‍यांमध्ये काही व्हॉटसअ‍ॅप संदेशही (Whatsapp Message) या प्रतिज्ञापत्रात नमूद केले आहेत.
नांगरे पाटील यांनी त्यांच्या वरिष्ठांना 1 जानेवारी 2018 रोजी 11.58 वाजता पाठवलेल्या व्हॉट्सअ‍ॅप संदेशात जमादार माळवाडकर (ब्रिटीश सैन्यातील शिपाई कोंडोजीबीन गजोजी जमादार यांचे वंशज) यांच्या घराला धोका असल्याचा उल्लेख आहे.

काही संघटनेने हे घर पाडण्याचे इनपुट दिले होते.
परंतु, अतिरिक्त बंदोबस्त आणि योग्य नियोजनामुळे आम्ही सर्व प्रयत्न निष्फळ करु शकलो, असे या संदेशात म्हटले आहे.
आदल्या दिवशी शनिवारवाड्यावर (Shaniwar Wada) झालेल्या भडकाऊ भाषणांचाही उल्लेख त्यात आहे.

 

त्यानंतर वढू बुद्रुक (Vadhu Budruk) येथील कायदा व सुव्यवस्थेचा (Law & Order) उल्लेख केला आहे.
28 व 29 डिसेंबरच्या मध्यरात्री वादग्रस्त इतिहास असलेला बोर्ड लावण्याने, त्यानंतर अ‍ॅट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.
संबधितांना अटक करण्यात आली.
नंतर गावातील नागरिकांना एकत्र बसवून हा प्रश्न सोडवला. (Koregaon Bhima Inquiry Commission)

 

या व्हॉट्सअ‍ॅप संदेशात 1 हजार मराठा तरुण विजयस्तंभाकडे कूच करत असल्याच्या ‘अफवा’चा उल्लेख केला होता.
ब्रिटिशांचा गौरव करतोय असा दावा करुन या मेळाव्याला हिंदुत्ववादी नेते मिलिंद एकबोटे (Hindutva Leader Milind Ekbote) यांनी विरोध केला होता.
त्यांना पोलिसांनी (Pune Rural Police) कोणत्याही संघर्षात भाग न घेण्याचा योग्य संदेश देण्यात आला होता,
असे म्हटले आहे.

तसेच दलित आणि डाव्या संघटना या मेळाव्याला नवपेशवाईच्या विरोधातील संघर्षाची सुरुवात दाखविण्याचा आणि दलित जनतेच्या भावना भडकावून त्याचे राजकीय फळ मिळविण्याचा प्रयत्न करीत आहेत,
असे या संदेशामध्ये नमूद केले आहे.

 

कोरेगाव भीमा फाटा (Koregaon Bhima Fata) येथे दुपारी साडेबारा वाजता दगडफेक (Stone Pelting)
झाल्याची माहिती मिळाल्यावर तातडीने पुण्याकडे (Pune) रवाना झाल्याचे त्यांनी यात म्हटले आहे.

 

विश्वास नांगरे पाटील यांनी 1 जानेवारी 2018 रोजीचे वायरलेस कम्युनिकेशन कॉल लॉग (Wireless Communication Call Log),
अधिकृत दस्तऐवज आणि जमाव शांत करण्यासाठी,
परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी वढु बुद्रुक आणि कोरेगाव भीमा परिसरात सामाजिक सलोख्यासाठी घेतलेल्या बैठकांबाबत वृत्तपत्रात आलेल्या बातम्यांची कात्रणेही जोडली आहेत.

 

Web Title :- Koregaon Bhima Inquiry Commission IPS officer Nangare Patil files affidavit on security threat to Jaystambh in charge s house bandobast preparation

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा