Koregaon Bhima Inquiry Commission | कोरेगाव भीमा हिंसाचार आयोग साक्षीसाठी शरद पवार यांना बोलवणार; कोरोनामुळे ठप्प झाले होते कामकाज

मुंबई न्यूज : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) –  कोरोना आणि लॉकडाऊनमुळे ठप्प झालेल्या कोरेगाव भीमा हिंसाचार आयोगाचे (Koregaon Bhima Inquiry Commission) कामकाज 2 ऑगस्टपासून पुन्हा सुरु होत आहे. आयोगाने राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार (Sharad Pawar) यांना साक्षीसाठी बोलविण्याचा निर्णय घेतला आहे. शरद पवार यांनी त्यांचे शपथपत्र आयोगासमोर यापूर्वीच दिले आहे. Koregaon Bhima Inquiry Commission

Join our Whatsapp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

कोरेगाव भीमा येथे १ जानेवारी २०१८ मध्ये दंगल झाली होती. त्यातून जातीय तेढ वाढली होती.
त्यावर तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुमित मल्लिक (Sumit Mallik) आणि निवृत्त न्यायामुर्ती जे. एन. पटेल (Retired Justice J. N. Patel) यांचा चौकशी आयोग नेमला होता.
या कोरेगाव भीमा हिंसाचार आयोगाने (Koregaon Bhima Inquiry Commission) सर्वांकडून प्रतिज्ञापत्रे मागविली होती. त्यानंतर काही जणांचे साक्षीपुरावेही झाले होते.

फेब्रुवारी २०२० मध्ये सागर शिंदे (Sagar Shinde) यांनी आयोगासमोर अर्ज सादर करुन शरद पवार यांना आयोगाने चौकशीसाठी बोलवावे, अशी विनंती साक्ष देताना केली होती.
त्यावेळी आयोगाने शरद पवार यांनी आयोगाला शपथपत्र दिले आहे.
त्यांना साक्षीसाठी बोलविले जाईल, त्यावेळी तुम्हाला जर प्रश्न विचारायचे असतील तर विचारु शकता असे सांगितले होते.
त्यानंतर आयोगाने शरद पवार यांची साक्ष नोंदविण्याची तारीखही निश्चित करण्यात आली होती.
मात्र, त्यानंतर अचानक कोरोनामुळे लॉकडाऊन सुरु झाले.
तेव्हापासून आयोगाचे कामकाज ठप्प झाले होते. त्यानंतर आता आयोगाचे कामकाज सुरु होत आहे.

Web Title : Koregaon Bhima Inquiry Commission to summon Sharad Pawar for witness; The work was halted due to corona

Join our Whatsapp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Indian Railways | रेल्वे प्रवासाचा अचानक बदलला प्लॅन, तर तिकिट कॅन्सल न करता ‘या’ पध्दतीनं बदला प्रवासाची तारीख; जाणून घ्या

WhatsApp द्वारे हॅकर्स ‘या’ पध्दतीनं करू शकतात तुमचे बँक अकाऊंट रिकामे, बचावासाठी अवलंबा ‘या’ टिप्स; जाणून घ्या

Health Tips | ‘या’ 5 पदार्थांचे सेवन दूधासोबत चुकूनही करू नका, होईल मोठे नुकसान