Koregaon Bhima Violence Case | कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणात संभाजी भिडेविरोधात पुरावे शोधायला हवेत – रामदास आठवले

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाइन – Koregaon Bhima Violence Case | कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणातील दोषारोपपत्रातून (Charge Sheet) सबळ पुरावे न मिळाल्याने शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे (Founder of Shiv Pratishthan Sambhaji Bhide) यांचे नाव वगळल्याची माहिती पुणे ग्रामीण पोलिसांनी (Pune Rural Police) राज्य मानवी हक्क आयोगाला (State Human Rights Commission) दिली आहे. तसा अहवालही सादर करण्यात आला आहे. त्यानंतर आता सोलापूर दौऱ्यावर असणारे रिपाइंचे नेते (RPI) केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले (Ramdas Athavale) यांनी यावर भाष्य केले आहे. ते म्हणाले, कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणात (Koregaon Bhima Violence Case) जरी संभाजी भिडे यांचे नाव वगळण्यात आले आहे तरी त्यांची सखोल चौकशी केली पाहिजे. त्यांच्या विरोधातील पुरावे शोधले पाहिजे. त्यांच्यावर कारवाई होण्याबाबत आपण आग्रही असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

 

प्रसारमाध्यमांशी बोलताना रामदास आठवले म्हणाले, भिडे गुरुजींवर (Bhide Guruji) कारवाई झाली पाहिजे अशी आपली मागणी कायम आहे. तपास यंत्रणेला त्यांच्या विरोधात ठोस पुरावे मिळाले नसतील म्हणून त्यांच नाव वगळलं असेल. पण तरीही त्यांच्यावरील कारवाईसाठी आपण ठाम आहोत. त्यांची सखोल चौकशी व्हायला हवी अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.

 

नेमकं प्रकरण काय?

पुणे ग्रामीण पोलिसांनी कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणात (Koregaon Bhima Violence Case) संभाजी भिडे यांच्याविरोधात गुन्हा (FIR) दाखल केला होता.
दरम्यान, या प्रकरणातील 41 आरोपींविरोधात यापूर्वीच न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केलं होतं.
त्यातून आता ठोस पुराव्याअभावी भिडे यांचे नाव वगळण्यात आले असल्याची माहिती पुणे ग्रामीण पोलिसांकडून मानवी हक्क आयोगापुढे झालेल्या सुनावणी दरम्यान दिली.
हिंसाचारात भिडे गुरुजींचा प्रत्यक्ष सहभाग नसल्याचे तपासात आढळून आले असल्याची माहिती पुणे पोलिसांनी दिली आहे.
कोरेगाव भीमा येथे 1 जानेवारी 2018 ला दोन गटात हिंसाचार झाला होता.
या हिसांचारापाठिमागे संभाजी भिडे यांचा हात असल्याचा आरोप करण्यात आला होता.

 

Web Title :- Koregaon Bhima Violence Case | bhima koregaon riots case rpi leader ramdas athawale statement on sambhaji bhide

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा