Koregaon-Bhima Violence Case | कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणात शरद पवारांची ‘या’ तारखेला पुन्हा साक्ष नोंदवणार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Koregaon-Bhima Violence Case | राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांना कोरेगाव – भीमा हिंसाचार चौकशी आयोगाने (Koregaon-Bhima Violence Inquiry Commission) समन्स पाठवलं आहे. शरद पवार यांची महत्त्वपूर्ण साक्ष कोरेगाव – भीमा चौकशी आयोग (Koregaon-Bhima Violence Case) प्रत्यक्ष नोंदवणार आहे. मुंबई येथील मलबार येथे सह्याद्री शासकीय अतिथीगृह (Sahyadri Government Guest House Malabar Mumbai) येथे येत्या 5 मे रोजी ही साक्ष नोंदवण्यासाठी प्रत्यक्ष येणार असल्याची माहिती चौकशी आयोगाचे सचिव व्ही. पळणीटकर (Secretary V Palanitkar) यांनी दिली.

 

मुंबईतील सह्याद्री शासकीय अतिथीगृह येथे सकाळी 11 ते सायंकाळी 5 या दरम्यान चौकशी आयोग सुनावणी घेणार आहे. कोरेगाव भीमा येथे 1 जानेवारी 2018 रोजी हिंसाचार (Koregaon-Bhima Violence Case) घडला होता. ही घटना पूर्वनियोजित होती, तसेच इतर काही व्यक्तव्ये शरद पवार यांनी केली आहेत. त्यापार्श्वभूमीवर त्यांची सुनावणीत पुरावे तसेच साक्ष नोंदविण्यात येणार आहे. तसेच चौकशी आयोग उलटतपासणी घेणार असल्याचे सचिव पळणीटकर यांनी सांगितले.

या अधिकाऱ्याच्या नोंदवल्या साक्ष
कोरेगाव भीमा चौकशी आयोगाने आत्तापर्यंत कोल्हापूर परिक्षेत्राचे तत्कालीन पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील (IPS Vishwas Nangre Patil),
तत्कालीन पुणे पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला (IPS Rashmi Shukla),
तत्कालीन पुणे पोलीस अपर पोलीस आयुक्त रवींद्र सेनगावकर (IPS Ravindra Sengaonkar),
आयपीएस अधिकारी संदीप पखाले (IPS Sandeep Pakhale),
पुणे ग्रामीणचे तत्कालीन पोलीस अधीक्षक सुवेझ हक (IPS Suvez Haque),
पुणे ग्रामीणच्या तत्कालीन पोलीस अधिकारी तेजस्वी सातपुते (IPS Tejaswi Satpute) आणि हर्षाली पोतदार तसेच वढू बुद्रुक, कोरेगाव भीमा येथील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य आणि स्थानिक ग्रामस्थांच्या साक्ष नोंदवल्या आहेत.

 

Web Title :- Koregaon-Bhima Violence Case | NCP Chief sharad pawar will appear as a witness again in mumbai regarding the violence at koregaon bhima of pune district

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा