Koregaon Crime News | सोने घडवण्याच्या बहाण्याने ३१ लाखांचा ऐवज घेऊन कारागीर फरार; कोरेगाव पोलिसात गुन्हा दाखल

पोलीसनामा ऑनलाइन : Koregaon Crime News | कोरेगाव परिसरात राहणारा मूळचा पश्चिम बंगालचा रहिवासी असणारा सोन्याचे दागिने घडवून देण्याचा व्यवसाय करणाऱ्या एका व्यक्तीने 51 तोळे 8 ग्रॅम सोने आणि दोन लाख रोख रक्कम असा एकूण 31 लाख 52 हजार 600 रुपये किमतीचा ऐवज घेऊन फरार झाला आहे. त्याच्या विरोधात कोरेगाव पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Koregaon Crime News)

गोपाल सुबोध सामूई (वय 38, मूळ रा. शामसुंदरपूर घाटाल, जि. मेदनापूर (पश्चिम), पश्चिम बंगाल, सध्या रा. कोरेगाव नगरपंचायतीसमोर) असे या आरोपी कारागिराचे नाव आहे. त्याच्या विरोधात मगर ज्वेलर्सचे मालक विशाल आकाराम मगर (वय 35, रा. शांतीनगर, कोरेगाव) यांनी फिर्याद दाखल केली आहे. फरार आरोपी सोन्याचे दागिने घडवून देतो म्हणून मगर यांच्या व्यापारपेठेतील दुकानातून तसेच 15 दिवसांपासून शहरातील इतर लोकांकडून देखील त्याने एकूण 51 तोळे 8 ग्रॅम सोने ताब्यात घेतले आहे. त्याचबरोबर त्यांनी मगर यांच्याकडून रोख रक्कम 2 लाख रुपये घेतले असून एकूण 31 लाख 52 हजार 600 रुपये किमतीचा ऐवज घेऊन हा आरोपी फरार झाला आहे. त्याच्या विरुद्ध कोरेगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून सहाय्यक पोलीस निरीक्षक एस.आर. बिराजदार हे पुढील तपास करत आहेत. (Koregaon Crime News)

आरोपी गोपाल सामूई हा गेल्या दहा वर्षापासून सोने घडवून देण्याचा व्यवसाय करत कोरेगाव मध्ये राहत होता.
त्यातूनच त्याने अनेकांचा विश्वास संपादन केला होता. आरोपीने गोपाल मगर यांच्यासह इतर सहा जणांचे देखील सोने घडवण्यासाठी घेऊन पळ काढला आहे. या घटनेने शहरात एकच खळबळ उडाली आहे.

Web Title :-Koregaon Crime News | gold artisan ran away with 31 lakhs of jewellery  case registered in koregaon police

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime News | पिस्तुलासह काडतुसे बाळगणाऱ्या सराईत गुन्हेगाराला दत्तवाडी पोलिसांकडून अटक

Ahmednagar Crime News | कोपरगावात पोटच्या लेकाचा खून करून आरोपी महिलेने रचला अपहरणाचा बनाव

Kangana Ranaut | दादासाहेब फाळके पुरस्कारांबद्दल कंगना रणौतने नाराजी व्यक्त करत नेपोटीजमवर केली टीका; म्हणाली…