पार्किंगमधील हॉटेल्सवर कोरेगाव पार्क पोलिसांची कारवाई

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन

 

कोरेगाव पार्क मधील हॉटेल चालक, मालक हे पार्किंग भागात बार चालवता. त्यामुळे या ठिकाणी दारु पिण्यासाठी येणारे रोडवर पार्किंग करतात. तसेच रात्री दहा नंतर स्पिकर चालू ठेवतात. अशी तक्रार स्थानिक रहिवाशांनी केली होती. यानंतर पोलिसांनी ९६ वाहन चालकांविरुद्ध कारवाई करुन १९ हजार २०० रुपयांचा दंड वसुल केला. तसेच पार्किंगमध्ये सुरु असणाऱ्या हॉटेल्सचे अतिक्रमण पुणे महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाला सांगून हटवण्यात आले.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’e2f545d2-c0c7-11e8-9d25-3b83cdd173eb’]

कोरेगाव पार्क येथील लेन नं. ५,६ व ७ मध्ये हॉटेल व्यवसायिक रात्री दीड नंतरही आपली हॉटेल्स चालू ठेवतात. त्यामुळे या ठिकाणी वाहतूक कोंडी होते. तर रात्री सुरु असणाऱ्या स्पिकरमुळे स्थानिक नागरिकांना त्रास सहन करावा लागत होता. वेळेवेळी सुचना करुन देखील हॉटेल व्यवसायिक याकडे दुर्लक्ष करीत होते. रात्री उशिरापर्यंत सुरु असलेल्या हॉटेल्स बाहेर वेडीवाकडी वाहने पार्क केली जातात. तसेच फुटथपाथ आणि रस्त्याच्या दुतर्फा वाहने पार्क करण्यात येतात. अखेर नागरिकांनी याची लेखी तक्रार पोलिसांकडे केली.

परिमंडळ २ चे पोलीस उपायुक्त बच्चन सिंग, लष्कर विभागाचे सहायक पोलीस आयुक्त जयश्री गायकवाड, कोरेगाव पार्क पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मदन बहाद्दरपुरे, कोरेगाव पार्क पोलीस ठाण्याचे कर्माचारी आणि वाहतुक विभागाचे कर्मचारी यांनी संयुक्तरित्या या ठिकाणी कारवाई केली. कारवाई दरम्यान वाहतुक नियमांचे उल्लंघन करणारे व बेशिस्तपणे रस्त्याच्या दुतर्फा वाहने उभी करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली.

गणेश मुर्तीची विटंबना करणारे अविनाश बागवे यांना जामीन मंजुर

या कारवाईत ९६ जणांवर दंडात्मक कारवाई करुन १९ हजार २०० रुपये दंड वसुल करण्यात आला. तर २५ वाहन चालकांविरुद्ध खटले दाखल करण्यात आले. तसेच लेन नं. ७ मधील ध्वनी प्रदूषण कायद्याचे उल्लंघन करणारे डेली ऑल डे डायनिग अँड बार व ईफिंगुट हॉटेल यांच्याविरुद्ध कारवाई करण्यात आली. तसेच ज्या हॉटेल चालकांनी पार्किंगमध्ये शेड मारुन हॉटेल व्यवसाय सुरु केला आहे त्या हॉटेलविरुद्ध कारवाई करण्यासाठी  पुणे अतिक्रमण विभागाला सांगण्यात आले होते. पुणे महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने कारवाई करुन पार्किंगमधील व टेरेसवरील अतिक्रमण काढून टाकले आहे.

[amazon_link asins=’B0784D7NFX’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’f88fd2a3-c0c7-11e8-b0ae-f53e13352625′]

वाहतूक नियमांचे उल्लंघन करणारे, बेशिस्त व दुतर्फा पार्किंग करणारे, वाहतुकीस अडथळा आणणाऱ्या वाहन चालकांविरुद्ध व ध्वनी प्रदूषण कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या हॉटेल चालक व मालकांविरुद्ध यापुढेही अशीच कारवाई सुरु राहणार असल्याचे पोलिसांकाडून सांगण्यात आले आहे.

[amazon_link asins=’B0756RF9KY’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’046a5684-c0c8-11e8-8110-0fef67d6dbc7′]