‘कोटक महिंद्रा’ बँकेनं 5 कर्मचाऱ्यांना बनवलं ‘अब्जाधीश’, पगाराच्या पॅकेजमध्ये मिळालेल्या ‘शेअर्स’मुळे झाले ‘मालामाल’

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : कोटक महिंद्रा बँकेचे प्रमुख उदय कोटक यांनी गेल्या दोन दशकांत आपल्या अनेक कर्मचाऱ्यांना अब्जाधीश आणि कोट्यावधी केले आहे. खासगी क्षेत्रातील या प्रमुख बँकेच्या 5 टॉप अधिकाऱ्यांजवळ बँकेचे जे शेअर्स आहेत त्यांचे मूल्य 100 कोटी रुपयांच्या पुढे गेले आहे.

म्हणजेच बँकेने आपले 5 कार्यकारी अब्जाधीश केले आहेत. हे शेअर्स या अव्वल कर्मचार्‍यांना मागील वर्षी स्टॉक ऑप्शनच्या रूपात म्हणजेच ESOPs च्या स्वरूपात देण्यात आले होते, जे की मोठ्या अधिकाऱ्यांच्या पगाराच्या पॅकेजचा एक भाग असतो. या दरम्यान बर्‍याच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आपले शेअर्स विकले आहेत, पण आज कंपनीत असे पाच वरिष्ठ अधिकारी आहेत ज्यांच्या शेअर्सची किंमत 100 कोटींच्या पुढे गेली आहे. बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी उदय कोटक आहेत. कोटक महिंद्रा बँकेची मार्केट कॅप 2,34,383 कोटी रुपये आहे.

बँकेचे 5 अब्जाधीश अधिकारी खालीलप्रमाणे आहेत-

1. शांती एकंबरम, ग्राहक बँकिंग प्रमुख
2. जयमीन भट्ट, बँक अध्यक्ष आणि ग्रुप सीएफओ
3. दीपक गुप्ता, बँकेचे सहव्यवस्थापकीय संचालक
4. नारायण एसए, बँकेचे अध्यक्ष (commercial banking & retail broking)
5. गौरांग शाह, बँकेचे अध्यक्ष (Asset Management, Insurance and International Business)

कोटक महिंद्राचे ग्राहक बँकिंग प्रमुख शांती एकंबरम यांच्या समभागांची किंमत 190 कोटी रुपये आहे. गेल्या अडीच दशकांपासून एकंबरम कोटक गटाचा एक भाग आहेत. बँकेचे अध्यक्ष आणि ग्रुप सीएफओ जयमीन भट्ट यांच्या समभागांची किंमत 160 कोटी रुपयांपर्यंत पोहोचली आहे. भट्ट 1985 मध्ये या समूहात सामील झाले आणि 2000 च्या दशकात ते ग्रुप सीएफओ झाले होते.

बँकेचे सहव्यवस्थापकीय संचालक दीपक गुप्ता यांच्या समभागांची किंमत 144 कोटी रुपये आहे. गुप्ता जवळजवळ तीन दशकांपासून बँकेशी जुडलेले आहेत. गुप्ता यांनाही बँकेच्या बोर्डावर स्थान देण्यात आले आहे आणि कोटक ग्रुपला बँकिंग क्षेत्रात आणण्यात त्यांचे मोलाचे योगदान आहे. 2003 साली येस बँके व्यतिरिक्त कोटक ही दुसरी खासगी बँक होती जिला बँकिंग परवाना देण्यात आला होता.

बँकेचे अध्यक्ष नारायण एसए यांच्या समभागांचे मूल्य 141 कोटी आहे. 90 च्या दशकाच्या सुरुवातीला कोटक समूहात सामील झालेल्या काही व्यावसायिकांपैकी नारायण हे एक आहेत. तर बँकेचे अध्यक्ष गौरंग शहा यांच्याकडे असलेल्या समभागांची किंमत 103 कोटी रुपयांवर पोहोचली आहे. प्रख्यात उद्योजक उदय कोटक यांनी स्वत:च्या दृष्टीने जी संपत्ती तयार केली आहे त्याचा फायदा समूहाशी दीर्घ काळापासून काम करणाऱ्या कार्यकारी अधिकऱ्यांना मिळाला आहे.

पुढील टप्प्यातही कोटक ग्रुप अनेक अब्जाधीश तयार करेल. कंपनीत आणखी बरेच अधिकारी आहेत ज्यांचे कोट्यावधी रुपयांचे शेअर्स आहेत. यांमध्ये डी. कन्नन, जयदीप हंसराज, जी. मुरलीधर, केव्हीएस मनियन, विराट दीवानजी, निलेश शाह, बीना चंद्रना आणि व्यंकटू श्रीनिवासन यांचा समावेश आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like