‘या’ बँकेच्या 27 लाख ग्राहकांना झटका ! आता बचत खात्यावर इतके टक्के कमी मिळणार व्याज

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – प्रायव्हेट सेक्टरमधील कोटक महिंद्रा बँकेने सोमवारी सेव्हिंग्स बँक अकाऊंटमध्ये मिळणारे व्याज कमी करण्याची घोषणा केली. कोटक महिंद्राने हे पाऊल आरबीआयने व्याजदरात कपात केल्यानंतर उचलले आहे. बँकेने माहिती दिली की, नवे दर 25 मे 2020, सोमवार म्हणजे आजपासूनच लागू झाले आहेत.

किती आहेत नवे व्याजदर
कोटक महिंद्रा बँकेने केलेल्या या कपातीनंतर आता बँकेच्या सेव्हिंग अकाऊंटवर 1 लाखाच्या डिपॉझिटवर नवीन व्याज दर 3.5 टक्के आहे. तर, 1 लाख रुपयांपेक्षा अधिकच्या डिपॉझिटवर 4 टक्के आहे.

याशिवाय, बेसिक सेव्हिंग्स बँक डिपॉझिट अकाऊंट/स्मॉल अकाऊंट होल्डर्सना समान व्याज मिळेल. नॉन-रेसिडेंट (एनआरई/एनआरओ) सीनियर आणि नॉन-सीनियर ग्राहकांसाठी दर 3.50 टक्के असेल.

मागच्या आठवड्यातच आरबीआयने रेपो रेटमध्ये 0.40 टक्के कपात केली होती. आरबीआयच्या या निर्णयानंतर आता रेपो रेट कमी होऊन 4 टक्के झाला आहे.

मार्च तिमाहीत 10 टक्के कमी झाले बँकेचे प्रॉफिट
मार्च तिमाहीमध्ये कोटक महिंद्रा बँकेचे नेट प्रॉफिट 10 टक्के घसरून 1,266 करोड रुपये झाले आहे. मागच्या वर्षी याच कालावधीत ते 1,407.80 करोड रुपये होते. बँकेने माहिती दिली की, आर्थिक वर्षात सरासरी सेव्हिंग डिपॉझिट 21 टक्के वाढून 85,656 करोड रूपये झाले होते. मागच्या आर्थिक वर्षात हे 70,990 करोड रूपये होते.

कोटक महिंद्रा बँकेत सरासरी करन्ट अकाऊंट डिपॉझिट 17 टक्के वाढून 33,699 करोड रुपये होते. आर्थिक वर्ष 2019 मध्ये हे 28,742 करोड होते.