Kothrud Assembly Election 2024 | चंद्रकांतदादांमुळे औंध -बाणेर रस्त्याचा तीस वर्षांपूर्वीचा प्रश्न सुटला..!

Kothrud Assembly Election 2024 | Thanks to Chandrakant Dada, the problem of Aundh-Baner road was solved thirty years ago..!

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Kothrud Assembly Election 2024 | महाराष्ट्राचे लोकप्रिय उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांतदादा पाटील (Chandrakant Patil) यांच्या कामाची तडफ प्रत्येक कोथरूडकराला माहीत झाली आहे. कोथरूड विधानसभा मतदार संघातून भाजपा-महायुतीचे उमेदवार म्हणून चंद्रकांतदादांनी अर्ज दाखल केला आहे आणि त्यांना मतदारसंघात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

कोथरूड विधानसभा मतदारसंघात चंद्रकांतदादांनी केलेली विकास कामे ठळकपणे सर्वांच्या लक्षात आहेत. त्यात प्रामुख्याने, पुणे महानगरपालिकेच्या विकास आराखड्यामध्ये औंध हद्दीतील सर्व्हे नंबर 158 आणि 159 मध्ये 18 मीटर डीपी रस्त्याचे प्रयोजन करण्यात आले होते. बाणेर गावाचा पुणे महानगरपालिकेत समावेश झाल्यानंतर हा रस्ता सरकवण्याचा प्रयत्न झाला होता. हा रस्ता झाला तर औंध, बाणेर मधील वाहतूक कोंडीची समस्या सुटणार होती.

तथापि, या प्रस्तावाला तीस वर्षे होऊन देखील अंमलबजावणी होत नव्हती. शेवटी चंद्रकांतदादांच्या लक्षात हा प्रश्न आला, त्यांनी जातीने लक्ष घालून हा प्रश्न सोडवला, आणि वाहतूक कोंडीतून नागरिकांची सुटका केली. हा प्रश्न मार्गी लागल्यामुळे तब्बल 30 वर्षानंतर पुणे महानगरपालिकेने बाणेर हद्दीमध्ये दिलेल्या झोनिंग दाखल्यामुळे औंध, बाणेर हद्दीतील सर्व्हे नंबर 158 लगत असलेला डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते नागरस रस्ता हा साठ फुटी डीपी रस्ता करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

विधानसभेची निवडणूक दि. 20 नोव्हेंबर रोजी आहे. कोथरूडकरांचे प्रत्येक काम घरचे समजून करणाऱ्या चंद्रकांतदादांच्या पाठीशी प्रत्येक जण उभा राहणार आणि दि. 23 नोव्हेंबर रोजी या मतदारसंघात चंद्रकांतदादांचाच गुलाल उधळला जाणार आहे, याची खात्री प्रत्येक कोथरूडकर देत आहे.

Total
0
Shares
Related Posts
Satish Wagh Murder Case

Satish Wagh Murder Case | पुणे : आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांच्या पूर्वीच्या भाडेकरुने पाच महिन्यापूर्वी दिली होती सुपारी; पोलिसांच्या तपासात धक्कादायक माहिती आली समोर