Pune : कोथरूड परिसरातील पादचारी महिलेचे मंगळसूत्र लांबविले

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कोथरुड परिसरात पादचारी महिलेच्या गळ्यातील 25 हजार रुपयांचे मंगळसूत्र जबरदस्तीने हिसकावून नेल्याचा प्रकार समोर आला आहे.

याप्रकरणी 65 वर्षीय महिलेने आलंकार पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार दुचाकीवरील दोन अनोळखी व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या सोमवारी सायंकाळी साडे सहा वाजण्याच्या सुमारास रस्त्याने पायी चालत जात होत्या. त्या पिनाक मेमरी सोसायटीच्या कॉर्नरला आल्या असता पाठीमागून भरधाव आलेल्या सोन साखळी चोरट्यांनी त्यांच्या गळ्यात हात घालत मंगळसूत्र हिसकवले. त्यांनी आरडाओरडा केला. पण चोरटे पसार होण्यात यशस्वी झाले. अधिक तपास पोलीस करत आहेत.