कोथरूडचे उमेदवार चंद्रकांत पाटील होणार ‘पुणेकर’

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – राज्यात गेल्या आठवडाभरापासून कोथरूड विधानसभा मतदारसंघ चर्चेत आहे. या मतदारसंघातून भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे महायुतीकडून निवडणूक लढवत आहेत. मात्र ते स्थानिक उमेदवार नसल्याने त्यांच्या उमेदवारीला लोकांचा विरोध आहे. या समस्येवर चंद्रकांत पाटील यांनी तोडगा काढला असून ते लवकरच पुणेकर होणार आहेत.

चंद्रकांत पाटील यांना पुण्यात घर मिळाले असून, आता ते पुणेकर होणार आहेत. मी पुण्यातील कोथरूड विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवित असल्याने, कुंबरे टाऊनशीपलगत असलेल्या आर. के. प्रेस्टीजमध्ये माझा एक मित्र राहत आहे. त्या मित्राने तात्पुरते घर राहण्यास दिले आहे अशी माहिती चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे.

ब्राह्मण संघटनांकडून चंद्रकांत पाटील यांच्या उमेदवारीला सुरुवातीपासूनच विरोध –

कोथरूड मतदारसंघातून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील तर त्यांच्या विरोधात मनसेचे उमेदवार किशोर शिंदे हे असून त्यांना आघाडीकडून पाठिंबा देण्यात आला आहे. तसेच अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाकडून जिल्हा अध्यक्ष मयुरेश अरगडे हे उमेदवार आहेत. कोथरूड विधानसभा मतदारसंघातून  चंद्रकांत पाटील यांना उमेदवारी दिली जाईल, अशी चर्चा सुरू होतात त्यांच्या नावाला विरोध सुरू झाला होता. दूरचा नको, घरचा पाहिजे, आमचा आमदार कोथरूडचा पाहिजे’ असे फलक कोथरूड परिसरात भाजपच्या कार्यकर्त्यांकडून लावण्यात आले होते तसेच  ब्राह्मण संघटनांकडूनही ब्राह्मण उमेदवारच द्यावा, अशी मागणी केली होती.

Visit : Policenama.com