५० रुपयांची लाच स्विकारताना कोतवाल अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

उस्मानाबाद : पोलीसनामा ऑनलाइन – प्रमाणपत्र देण्यासाठी ५० रुपयांची लाच स्विकारणारा कोतवालाला अ‍ॅन्टी करप्शनच्या पथकाने सापळा रचून रंगेहाथ पकडले. ही कारवाई आज वाशी तहसील कार्य़ालयात करण्यात आली. लक्ष्मण साहेबा शिंदे असे रंगेहाथ पकडण्यात आलेल्या कोतवालाचे नाव आहे.

तक्रारदार यांनी जात प्रमाणपत्र काढण्यासाठी तहील कार्य़ालयातून १९५१ सारचे खासरा व जनगणना अशी दोन प्रमाणपत्रांची गरज होती. त्यासाठी त्यांनी अर्ज केला होता. अनेकवेळा तहसील कार्यालयात चकरा मारून देखील कोतवाल लक्ष्मण शिंदे हा प्रमाणपत्र देत नव्हता. प्रमाणपत्र देण्यासाठी शिंदे याने तक्रारदार यांच्याकडे लाचेची मागणी केली. याची तक्रार तक्रारदाराने उस्मानाबाद लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. पथकाने पडताळणी करून तहसील कार्यालयात सापाळा रचला. कोतवाल लक्ष्मण शिंदे याला ५० रुपयांची लाच स्विकारताना रंगेहाथ पकडण्यात आले.

ही कारवाई पोलीस उप अधिक्षक रविंद्र थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विनय बहीर यांच्या पथकाने केली. आरोपी लक्ष्मण शिंदे याच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यानुसार कारवाई करून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सरकारी कामासाठी लोकसेवक लाचेची मागणी करीत असल्यास नागरिकांनी लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडे तक्रार करावी, असे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. तसेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या १०६४ या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा.

सर्दीची ‘अ‍ॅलर्जी’ का होते ? जाणून घ्या यामागील कारणे

‘तारूण्य’ टिकवण्यासाठी हसत रहा, जाणून घ्या महत्वाचे फायदे

विविध रंगाच्या बाटल्यांमधील पाणी सेवन करा, आरोग्य सुधारेल