KBC 11 : शेतकर्‍याचा मुलगा बनला पहिला ‘करोडपती’, आता 7 कोटी जिंकणार ?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – 19 ऑगस्टपासून कौन बनेगा करोडपती’ चे 11 वे सीझन सुरु झाले आहे. या सीझनमध्ये प्रथमच एक स्पर्धक 1 कोटी जिंकला आहे.  1 कोटी जिंकलेल्या व्यक्तीचे नाव सरोज राज असे आहे. कौन बनेगा करोडपतीच्या नव्या सीझनमध्ये आतापर्यंत दोन स्पर्धक 1 कोटीच्या प्रश्नावर पोहोचले होते , परंतु अद्याप कोणीही  करोडपती बनू शकला नव्हता.

सरोज राज यांनी 1 कोटी जिंकल्यानंतर अमिताभ बच्चन यांनी त्यांना विचारले की, ‘ तुम्हाला कसे वाटते. त्यावर सरोजने प्रतिक्रिया दिली की 1 कोटी जिंकलो यावर विश्वास बसत नाहीये.  आपल्या भविष्यातील स्वप्नांबद्दल सांगताना ते म्हणाले की ,मला समाजासाठी काम करायचे आहे.’

सरोज राजांचा प्रवास फक्त 1 कोटीपर्यंतच थांबत नाही, तर तो 7 कोटींचाही  प्रश्न खेळणार आहे. यावेळी कौन बनेगा करोडपतीमध्ये 16 प्रश्नांचा खेळ आहे. तर विजयी रक्कम 7 कोटी आहे. 7 कोटींचा प्रश्न सरोज जिंकतो की नाही याच उत्तर पुढच्या भागात नक्की मिळेल.

कोण आहे सरोज राज –

सरोज बिहारच्या जहानाबादचा आहे. त्याचे कुटुंब शेती करतात. आयएएस होण्याचे त्याचे स्वप्न आहे.

सरोजच्या आधी गव्हर्नमेंट फ्लाइंग इंस्टीट्यूशनमध्ये ट्रेंनिंग घेणाऱ्या 19 वर्षांच्या हिमांशूने 50 लाख जिंकून खेळ सोडला होता. हिमांशूच्या आधी लेबर इंस्पेक्टर चरणा गुप्ता 1 कोटीच्या प्रश्नपर्यंत पोहचली होती. मात्र 50 लाखाच्या प्रश्नावरच तिचा खेळ संपुष्टात आला.

Loading...
You might also like