‘ही’ रिअ‍ॅलिटी स्टार बाथटबमधील फोटोमुळे ‘ट्रोल’, नेटीझन्स म्हणाले – ‘अशिक्षित’, मिळालं ‘हे’ उत्तर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – रिअ‍ॅलिटी स्टार कोर्टनी कार्दशियन (Kourtney kardashian) सध्या आपल्या फोटोमुळे इंटरनेटवर गाजत आहे. तिने नुकताच एक फोटो सोशलवर शेअर केला आहे ज्यात ती बाथटबमध्ये झोपल्याचे दिसत आहे. सोशल मीडियावर हा फोटो प्रचंड व्हायरल झाला असून अनेक नेटकऱ्यांनी या फोटोवर कमेंट केली आहे. अनेकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आपापली मते मांडली आहेत.

काही युजर्सने म्हटलं आहे की, ती वाचन करत नसून वाचण्याचे नाटक करत आहे. काहींनी तर तिला अशिक्षितही म्हटलं आहे. अनेकांनी तिला ट्रोल केले आहे. वेगवेगळे प्रश्न विचारले आहेत. काहींनी विचारलं आहे की, ती खरंच शिकलेली आहे का. एका युजरने म्हटलं आहे ती कधीच पुस्तक वाचत नाही. यामुळेच तर कोर्टनी एकदम चकितच झाली. तिने आपल्या या फॉलोवरला त्वरीत उत्तर दिले, “मी ग्रॅज्युएट आहे.” इतकेच नाही तर आणखी युजरच्या कमेंटनंतर तिने तिच्याकडील अनेक पुस्तकांचा फोटोही शेअर केला. यासोबतच ती म्हणाली की, “मी रोज रात्री वाचण्याचा प्रयत्न करते.”

खरंतर कोर्टनी कार्दशियनने आपल्या लाईफ स्टाय वेबसाईटला प्रमोट करण्यासाठी हा फोटो शेअर केला होता. जसा वाचन करतानाचा फोटो तिने शेअर केला तसा क्षणातच तो व्हायरल झाला. यानंतर ट्रोलर्स तिला अनेक प्रश्न करू लागले. यात ती साक्षर असण्यावरही प्रश्न उपस्थित होताना दिसले. परंतु तिने सडेतोड उत्तर दिले.

Visit : policenama.com