COVID-19 मुळे भारतात 18,000 लोकांचा होऊ शकतो मृत्यू : तज्ञ

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतात कोविड-१९ ची प्रकरणे जुलैच्या सुरूवातीला शिगेला पोहोचण्याची शक्यता असून या जागतिक महामारीमुळे भारतात १८,००० लोकांचा जीव जाऊ शकतो. असे एका महामारी आणि सार्वजनिक आरोग्य तज्ञांनी सांगितले आहे. सेंटर फॉर कंट्रोल ऑफ क्रॉनिक कंडिशन्स (सीसीसीसी) चे संचालक प्रो डी. प्रभाकरन म्हणाले की, देशात ही महामारी वाढण्याच्या दिशेने आहे.

प्रभाकरन हे ब्रिटनमधील लंडन स्कूल ऑफ हायजीन आणि ट्रॉपिकल मेडिसिनच्या महामारी विज्ञान विभागात प्राध्यापक देखील आहेत. जुलै महिन्यात भारतात कोरोना विषाणूची सर्वाधिक समोर येऊ शकतात, असे तज्ञांनी सांगितले. त्यांनी बुधवारी सांगितले की, ते वेगवेगळ्या संशोधनांवर आधारित आहे आणि इतर देशांमध्ये या महामारीच्या वाढीच्या आणि कमी होण्याच्या अंदाजावर आधारित आहे.

ते म्हणाले की, आपल्याकडे चार ते सहा लाख प्रकरणे संक्रमितांची असू शकतात आणि मृत्यूचा सरासरी दर ३ टक्के असू शकतो, जो १२,०००-१८,००० च्या आसपास असेल. प्रभाकरन म्हणाले की, मर्यादित आकडेवारी पाहिल्यास असे दिसत आहे की इथे मृत्यूदर कमी आहे. परंतु वास्तविक तसे आहे की नाही हे महामारीच्या समाप्तीनंतरच कळू शकेल.

हैदराबादच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ येथील संचालक प्रो. जी.व्ही.एस. म्हणाले की, दक्षिण आशियामध्ये मृत्यूदर श्रीलंकेमध्ये सर्वात कमी आहे जो प्रति १० लाखावर ०.४ आहे. भारत, सिंगापूर, पाकिस्तान, बांगलादेश आणि मलेशियामध्ये प्रति दहा लाख लोकसंख्येवर मृत्यूदर समान आहे. या देशांमध्ये मृत्यूचे प्रमाण कमी का आहे हे सांगणे कठीण आहे. त्यांच्या मते, कदाचित असे होऊ शकते की या देशांनी महामारीच्या सुरूवातीला समुदाय लॉकडाऊन सुरू केले होते, जे मृत्यूदर कमी असण्याचे कारण असू शकते. तर युरोप आणि अमेरिकेने ही पावले उशिरा उचलली.

प्रो. मूर्ती म्हणाले की, जर आपण जगात आणि भारतात पाहिले तर असे आढळते की मृत्यूचे प्रमाण ६० वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त वयाच्या लोकांमध्ये सर्वाधिक आहे. भारतात कोविड-१९ मुळे मृत्यू झालेल्यांपैकी ५० टक्के लोक ६० वर्षे किंवा त्याहून अधिक वयाचे होते.