COVID -19 : फक्त 5 मिनिटात ‘कोरोना’चा ‘रिपोर्ट’ देणारं ‘किट’ लवकरच उपलब्ध, केवळ 100 रुपयांत होणार ‘तपासणी’

नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोना विषाणू विरुद्ध भारताने युद्ध पुकारले आहे. देशात एकीकडे लॉकडाऊन आहे, तर दुसरीडे डॉक्टर, नर्स पॅरामेडिकल स्टाफ रुग्णांचे उपचार करण्यावर व्यस्त आहेत, असे असताना देशातील सर्वोच्च संशोधन संस्था, वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद (सीएसआयआर) या विषाणूवर परवडणारी चाचणी किट आणि उपचारांचा शोध घेत आहे. या विषयावर सीएसआयआरचे महासंचालक शेखर सी. मंडे यांच्याशी एका वृत्तपत्राने बातचीत केली आहे, त्यांना मुलाखतीत काही प्रश्न करण्यात आले आहेत, त्या बद्दल जाणून घेऊया…

प्रश्न : प्राणघातक कोरोना विषाणूचा सामना करण्यासाठी आपण काय करीत आहात?

उत्तर : आम्ही पाच उपाययोजना करीत आहोत. प्रथम ज्या भागात विषाणूचा प्रसार झाला आहे त्या प्रदेशात, त्या भागात असलेल्या आमच्या प्रयोगशाळा मॉलिक्यूलर सर्विलांस करत आहेत कारण या विषाणूचा धोका, त्याचा प्रभाव आणि प्रकृती अधिक चांगल्या प्रकारे समजू शकेल. दुसरे म्हणजे आम्ही किफायतशीर चाचणी किट बनवण्यावर काम करत आहोत. तिसरे म्हणजे, औषधे बनविणे. चौथे, रुग्णालये आणि वैयक्तिक संरक्षण उपकरणे बनविली जात आहेत आणि पाचवे म्हणजे देशाच्या प्रत्येक भागात वैद्यकीय उपकरणांचा पुरवठा सुनिश्चित करण्यावर भर दिला जात आहे.

प्रश्न : आता कोविडच्या चाचणीची किंमत पाच हजार आहे आणि त्यास सहा तास लागतात, आपण कोणत्या प्रकारचे किट बनवत आहात?

उत्तर : आम्ही असे पेपर टेस्ट किट विकसित करीत आहोत ज्याची चाचणी घेण्यासाठी फक्त पाच-दहा मिनिटे लागतील. त्याची किंमतही शंभर रुपयांच्या जवळपास असेल. आमची दिल्ली स्थित प्रयोगशाळा इंस्टीट्यूट ऑफ जीनोमिक्स अँड इंटिग्रेटिव्ह बायोलॉजीचे शास्त्रज्ञ लवकरच किट तयार करतील. या किट ने कुठेही तपासणी केली जाईल.

प्रश्न : आपण औषध शोधू शकाल काय?

उत्तर : सीएसआयआरच्या नॅशनल केमिकल लॅबोरेटरी पुणे, सेंट्रल ड्रग रिसर्च लॅबोरेटरी लखनऊ आणि इंडियन इंस्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी हैदराबाद या तीन प्रयोगशाळा यावर कार्यरत आहेत. आम्ही सिप्ला आणि कॅडिला झाइडस या खासगी क्षेत्रातील कंपन्यांसमवेत सामंजस्य करार केले आहेत. संशोधन सुरू केले आहे. आशा आहे की आम्ही या आजारावर प्रभावी औषध शोधू.

प्रश्न : देशात व्हेंटिलेटरची कमतरता आहे, या दिशेने तुम्ही काय काम करीत आहात?

उत्तर : मी म्हटल्याप्रमाणे आम्ही बीएचईएल सोबत रूग्णालये आणि वैयक्तिक संरक्षण उपकरणे बनविण्यासाठीही काम करत आहोत. बीएचईएल सोबत आम्ही दहा हजार रुपये किंमतीचे व्हेंटिलेटर विकसित करीत आहोत. तीन मॉडेल तयार करण्यात आहे आहेत. उच्च मॉडेलची किंमत सुमारे एक लाख असेल. हे परवडणारे व्हेंटिलेटर देशातील प्रत्येक रुग्णालये आणि प्राथमिक आरोग्य केंद्रात पोहोचविणे सोपे होईल.

प्रश्न : कोविड -19 स्वतःच काळानुसार कमकुवत होईल असा अंदाज वर्तविला जात आहे. हे शक्य आहे का?

उत्तर : अशी शक्यता आहे. असे आढळून आले आहे की काही काळानंतर लोकांमध्ये विषाणूंविरूद्ध ‘हर्ड इम्यूनिटी’ येते. परंतु जेव्हा ती येईल तोपर्यंत बर्‍याच लोकांना हा विषाणू संक्रमित करू शकतो. 50-60 टक्के लोकसंख्या जेव्हा या विषाणूचा सामना करते तेव्हा रोग प्रतिकारशक्ती येते.

प्रश्न : कोविड -19 हे जैविक शस्त्र म्हणून तयार करण्यात आले होते का?

उत्तर : ही केवळ अटकळ आहे. नैसर्गिक कारणांमुळे व्हायरस बदलतात. कधीकधी हे बदल अधिक प्रमाणात होतात आणि या वेळेस तसेच झाले. यामुळे, मानवी शरीर प्रतिरोधक होत नाही.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
Cinque Terre
You might also like