कोझिकोड विमान अपघाताच्या चौकशीसाठी 5 सदस्यीय समिती गठित

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – केरळमधील कोझिकोड विमानतळावर एअर इंडिया एक्सप्रेस विमान अपघाताच्या चौकशीचे आदेश एअरक्राफ्ट अपघात अन्वेषण ब्युरोने दिले आहेत. आता या विमान अपघाताची चौकशी कॅप्टन एस. एस. चाहर यांच्या नेतृत्वात पाच सदस्यांची टीम करणार आहे. हे पथक अपघातास कारणीभूत आणि संभाव्य कारणे शोधेल.

कोझिकोड विमान अपघात नसून खून असल्याचे हवाई सुरक्षा तज्ज्ञ कॅप्टन मोहन रंगनाथन यांनी म्हटले होते. सुरक्षा सल्लागार समितीच्या इशार्‍याकडे दुर्लक्ष केल्यामुळे हा अपघात झाला. लेखापरीक्षणामध्ये सुरक्षाविषयक समस्या नोंदवण्यात आल्या होत्या. हा अपघात टाळता आला असता, असेही रंगनाथन म्हणाले होते. नागरी उड्डाण मंत्रालयाने गठीत केलेल्या सुरक्षा सल्लागार समितीचे सदस्य असताना रंगनाथन यांनी कालिकत (आता कोझिकोड) विमानतळ लँडिंगसाठी सुरक्षित नाही, असा इशारा दिला होता. दरम्यान, या अपघातात दोन पायलटसह 18 जणांचा मृत्यू झाला होता. तर 170 लोकांचा वाचवण्यात आले होते.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like