मॅच फिक्सिंग प्रकरणात आंतरराष्ट्रीय ‘बुकी’ला हरियाणामधून अटक, क्रिकेट जगतात ‘खळबळ’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कर्नाटक प्रीमियर लीगमध्ये (KPL) मॅच फिक्सिंग प्रकरणी सेंट्रल क्राइम ब्रँचने आंतरराष्ट्रीय बुकी सय्याम याला अटक केली आहे. सय्याम हा हरियाणाचा रहिवाशी असून त्याला अटक करण्यासाठी लूक आऊट नोटीस पाठवण्यात आली होती. 2019 च्या केपीएलमध्ये अंतिम सामन्यात स्पॉट फिक्सिंग झाल्याचं समोर आलं होतं. केपीएलशिवाय तामिळनाडू प्रीमियर लीगमध्येही मॅच फिक्सिंग स्कँडल समोर आलं आहे.

यापूर्वी केपीएल प्रकरणात मॅच फिक्सिंग प्रकरणी निशांत शेख या भारतीय क्रिकेटपटूला सट्टेबाजीच्या आरोपाखाली तर केपीएलच्या 2019 च्या बेल्लारी टस्कर्सकडून खेळणाऱ्या कर्णधार सीएम गौतम आणि अबरार काझी यांनी अंतिम सामन्यात स्पॉट फिक्सिंग केल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. तसेच बेंगळुरू ब्लास्टर्सचे टीमचे बॉलिंग प्रशिक्षक वीनू प्रसाद, सेलिब्रिटी ड्रमर भावेश बाफना यांनाही ताब्यात घेण्यात आलं आहे.

कर्नाटक राज्य क्रिकेट असोसिएशनने केपीएल 2009 मध्ये सुरू केली होती. आयपीएलच्या धर्तीवर कर्नाटकमधील खेळाडूंसाठी ही लीग सुरू करण्यात आली होती. या मॅच फिक्सिंगमुळे केपीएलच्या प्रतिमेला धक्का बसला आहे.

Visit : Policenama.com