Kranti Redkar | क्रांती रेडकरचं ट्विट चर्चेत, म्हणते – ‘नवाब चाचा…समीर वानखेडे… दहशत असावी तर अशी..’

पोलीसनामा ऑनलाईन टीम : Kranti Redkar | गेल्या अनेक दिवसांपासून समीर वानखेडे( Samir Vankhede) आणि मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांच्यात आरोप – प्रत्यारोप यांची मालिका सुरु आहे. मुंबई हायकोर्टात (Mumbai High Court) तर मलिक विरुद्ध वानखेडे हे प्रकरण चांगलेच गाजत आहे. समीर वानखेडे यांच्या संपूर्ण कुटुंबियांनीही त्यांच्या बाजूने उभे राहत या प्रकरणात उडी घेतली आहे. मंत्री नवाब मालिकांच्या वकीलाकडून समीर वानखेडेंचे कुटुंब मुस्लिम असून त्यांनी केवळ सरकारी नोकरी लाटण्यासाठी स्वतःला अनुसूचित जातीचे सांगितल्याचा आरोप करण्यात आला होता. तर समीर वानखेडे यांचे वकील अरशद शेख (Arshad Sheikh) यांनी ज्ञानदेव वानखेडे (Dnyandev Wankhede) यांची बाजू मांडताना तुम्ही आम्हाला कोणत्याही नावाने हाक मारा पण दाऊद म्हणू नका असे प्रतिउत्तर दिले होते.

यानंतर नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांच्या शाळेचे प्रमाणपत्र सादर केले होते. त्यामध्ये सेंट जोसेफ हायस्कूलच्या (St. Joseph’s High School) प्रवेश फॉर्ममध्ये समीर वानखेडेंचे नाव समीर दाऊद वानखेडे असल्याचं दाखवण्यात आले होते. यानंतर समीर वानखेडे यांच्या पत्नी व मराठी अभिनेत्री क्रांती रेडकर (Kranti Redkar) यांनी मलिकांच्या आरोपाला उत्तर देत समीर वानखेडेंचं शाळेचं प्रमाणपत्र शेअर केले होते.

या प्रकरणाशी संबंधित समीर वानखेडे आणि नवाब मलिकांच्या वकिलांनी आतापर्यंत बरीच कागदपत्र कोर्टात सादर केली. त्यावर आता कोर्टाने दोघांनाही यापुढे कोणतेही प्रमाणपत्र सादर करू नका असं स्पष्ट केलं आहे. दोन्हीकडच्या बाजू ऐकून घेतल्यावर 22 नोव्हेंबरला या प्रकरणावर निर्णय दिला जाईलं असे कोर्टाकडून स्पष्ट करण्यात आले. यानंतर आज क्रांती रेडकर (Kranti Redkar) यांनी ‘ नवाब मलिक रोज समीर वानखेडेंविषयी बोलून,नवनवीन पुरावे सादर करीत आहेत. मला वाटतं ते दिवसभर जणू समीर वानखेडेंना कसं फसवता येईल याचाच विचार करीत आहेत. माझे पती प्रामाणिक अधिकारी आहेत त्यामुळे त्यांना फसवण्यासाठी मलिकांना खूप मेहनत घ्यावी लागतेय.’ अशा आशयाचे ट्विट केले आहे.

क्रांती रेडकर यांनी नेमके काय ट्विट केले ?

”वाह!क्या खौफ है,सोते,जागते उठते,बैठते नवाब चाचा सिर्फ समीर वानखेडे के बारे में सोचते है,सुबह हुई नही की ट्वीट शुरू. डर पैदा करो तो ऐसा. पावर ऑफ वन हॉनेस्ट ऑफिसर.” क्रांतीच्या (Kranti Redkar) या ट्विटवर अनेकांनी कमेंट्ससुद्धा केल्या आहेत. या कमेंट्समध्ये काहींनी क्रांतीला सपोर्ट केलाय तर काहींनी समीर वानखेडेंच्या विरोधातही भाष्य केलंय. आता क्रांतीने केलेल्या या ट्विटवर नवाब मलिक नेमके काय उत्तर देतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

 

Web Title : Kranti Redkar | Kranti Redkar’s tweet in the discussion, says – ‘Nawab Chacha … Sameer Wankhede … If there is panic, then so be it ..’

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Farm Laws | शेतकरी आंदोलनाचा मोठा विजय ! वर्षभरापासून सुरू होतं आंदोलन; 600 शेतकर्‍यांचा बळी का घेतला?, विरोधकांचा पीएम मोदींवर हल्ला

Farm Laws | PM नरेंद्र मोदींचा मोठा निर्णय ! 3 कृषी कायदे केंद्राकडून रद्द; देशवासियांची माफी मागून 7 वर्षाच्या काळात प्रथमच घेतले पाऊल मागे (व्हिडीओ)

Pune Crime | काय सांगता ! होय, चक्क पुणे महापालिकेला 1 कोटी रुपयांचा गंडा घालण्याचा प्रयत्न; गुन्हा दाखल, जाणून घ्या प्रकरण

Balasaheb Thorat | ‘पोटनिवडणूक बिनविरोध करावी याबाबत फडणवीसांसोबत चर्चा’ – थोरात

Maharashtra Gram Panchayat by-election | महाराष्ट्रातील 7 हजार ग्रामपंचायत सदस्यांच्या पोटनिवडणुकांसाठी तारखा जारी

Kanyaka Bank Chandrapur Recruitment 2021 | श्री कन्यका नागरी सहकारी बँकेत विविध पदांसाठी भरती, जाणून घ्या

NCP MLA Babajani Durrani | राष्ट्रवादीचे आमदार बाबाजानी दुर्राणी यांना गोळ्या घालून ठार मारण्याची धमकी; प्रचंड खळबळ