Kranti Redkar | वानखेडेंच्या पत्नी क्रांती रेडकर यांचा नवाब मलिकांवर पलटवार, म्हणाल्या – आरोप चोमडेपणासारखे, किचन पॉलिटिक्समधून बाहेर या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Kranti Redkar | आर्यन खान प्रकरणी (Aryan Khan Drug Case) अनेक खुलासे समोर येत आहे. त्यातच मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) हे एनसीबी अधिकारी समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्यावर वारंवार आरोप करताना दिसत आहेत. आजही मलिक यांनी समीर वानखेडेंवर गंभीर आरोप केला आहे. या आरोपानंतर आता समीर वानखेडे यांच्या पत्नी क्रांती रेडकर (Kranti Redkar) यांनी नवाब मलिकांना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. रेडकर यांनी पत्रकार परिषेद घेऊन मलिकांवर पलटवार केला आहे.

काय म्हणाल्या क्रांती रेडकर?

क्रांती रेडकर (Kranti Redkar) म्हणाल्या की, आजकाल बायकापण असं वागत नाहीत, महिला पण पुढारलेल्या आहेत. पण किचनमध्ये चोमडेपणा करतात ना?, तुला माहिती आहे का? असं झालं, तसं झालं, हे तसंच सुरू आहे. किचन पॉलिटिक्स. असं म्हणत नवाब मलिकांचे (Nawab Malik) आरोप चोमडेपणासारखे असल्याचं रेडकर यांनी म्हटलं आहे. यातून आता थोडं वर यायला हवं. मालदिवमध्ये म्हणे बॉलिवूड सेलिब्रेटी होते, मग सांगा कोण सेलिब्रेटी होते. एक ट्विटर तुम्हाला मिळालं आहे आणि त्यावर काहीही लिहित आहात. तुम्ही एक रिस्पेक्टेड पर्सन्रलिटी आहात त्यामुळे असं काहीही लिहू नका, असं क्रांती रेडकर म्हणाल्या.

Crime News | बलात्कार प्रकरणी काँग्रेस आमदाराचा पुत्र अटकेत

पुढे त्या म्हणाल्या, माझा पती खोटारडा नाही, रोज काय काय स्पष्टीकरण देत बसायचं? समीर वानखेडेंच्या वडिलांनी आधीच जन्म दाखला सादर केला आहे. समीर वानखेडे यातून नक्कीच बाहेर येतील. त्यांना अडकवण्याचा आणखी प्रयत्न होईल. मात्र, हे आरोप सिद्ध होणार नाहीत. सत्याचा नेहमी विजय होतो. समीर वानखेडे सत्याच्या मार्गाने काम करतात, ते अनेकांना खटकतं. आम्ही नेहमीच लढत राहू. नवाब मलिकांच्या (Nawab Malik) आरोपांना वेळच उत्तर देईल.

मी तुम्हाला शुभेच्छा देते, तुमचं कुटुंब चांगलं रहावं, आनंदी रहावं. आमच्याकडून तुम्हाला पॉझिटिव्हिटी मिळेल. मराठी असल्याचा अभिमान पण, धमक्या येतात हे सुद्धा तितकेच सत्य आहे. जातीवरुन केलेले खोटे आरोप सहन करणार नाही. सोशल मीडियात ट्रोल करणाऱ्यांचा शोध लावणार, आम्हाला जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत. धमक्या देणाऱ्यांचा लवकरच पर्दाफाश होईल, असं त्या म्हणाल्या. तसेच, पुरावे असतील तर कोर्टात जावं, ट्विट करुन लोकांचा वेळ वाया का घालवता? मंत्री म्हणून सोशल मीडियाचा योग्य वापर करा. असं क्रांती रेडकर म्हणाल्या.

हे देखील वाचा

EPFO Alert | पीएफ मध्ये आलेले व्याजाचे पैसे होतील गायब, चुकूनही शेयर करू नका ‘हा’ नंबर; जाणून घ्या

Life Certificate | नियमीत पेन्शन मिळण्यासाठी ‘या’ तारखेपूर्वी जमा करा लाईफ सर्टिफिकेट, जाणून घ्या काय आहे प्रोसेस?

Mumbai Drug Case | वानखेडेंवर मलिकांचा लेटर बॉम्ब, स्पेशल 26 बाबत केला गोप्यस्फोट; जाणून घ्या पत्रात?

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : Kranti Redkar | ncb officer sameer wankhede wife kranti redkar angry over nawab malik allegation said his allegation like womens kitchen politics

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update