Kranti Redkar | क्रांती रेडकरचा मंत्री नवाब मलिक यांच्यावर ‘घणाघात’, म्हणाल्या…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Kranti Redkar | राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) आणि एनसीबी (NCB) अधिकारी समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्यामध्ये काही दिवसांपासून वाद सुरु आहे. नवाब मलिक दररोज वानखेडेंवर आरोप करीत आहेत. कधी जातीच्या दाखल्यावरून तर कधी मालमत्तेवरून मलिक वानखेडेंवर निशाणा साधत आहे. नुकताच त्यांनी एका बार आणि रेस्ताराँचे मालक वानखेडे असल्याचा दावा केला होता. त्यावरून आता समीर वानखेडे यांची पत्नी आणि अभिनेत्री क्रांती रेडकर (Kranti Redkar) हिने ट्विटरद्वारे मलिक यांना चोख उत्तर दिले आहे.

क्रांतीने दोन फोटो ट्विट केले असून त्यातील एका फोटो नवाब मलिक यांच्या ट्वीटचा स्क्रिनशॉट आहे, तर दुसऱ्या फोटोत समीर वानखेडे यांच्या मालकीचे आहे असे सांगितलेल्या बार आणि रेस्ताराँबाबत माहिती दिली आहे. एवढच नाही तर क्रांतीने (Kranti Redkar) मलिकांवर निशाणा देखील साधला आहे. मलिकांबाबत ‘फर्जीवाडा’ असा शब्दप्रयोग करत टीका केली आहे. ट्वीटमध्ये क्रांती म्हणते की, पहिल्या फोटोत बारचा दावा करण्यात आलाय. दुसऱ्या फोटोत सदगुरू फॅमिली रेस्तराँ अँड बार दिसत आहे. पुन्हा एकदा फर्जीवाडा. या लोकांचा कितीवेळा पर्दाफाश करायचा, जबाबदार पदावर बसून हे असं वागताहेत. हे केवळ समीर वानखेडे यांचं नाव खराब करण्यासाठी सुरू आहे, असं तिन म्हंटल आहे.

 

 

बारवरुन नवाब मलिकांचे आरोप

काही दिवसांपूर्वी नवाब मलिक यांनी मुंबईमधील एका बार आणि रेस्तराँचे मालक समीर वानखेडे असल्याचा दावा त्यांनी केला आहे. इतकच नाही तर ट्विटरवर सद्गुरु रेस्ट्रो बारचा फोटोदेखील शेअर केला होता. त्याखाली त्यांनी कॅप्शन ही लिहिली होती. त्यामध्ये त्यांनी समीर दाऊद वानखेडे यांचे हे फर्जीवाडा केंद्र आहे असे म्हटले होते. दरम्यान, या बारसंदर्भात उत्पादन शुल्क विभागाने (state excise department ) दिलेल्या माहितीनुसार २७ ऑक्टोबर १९९७ मध्ये या बारला परवाना देण्यात आला होता. त्याची मुदत ३१ मार्च २०२२ पर्यंत आहे.

समीन वानखेडे यांचे स्पष्टीकरण

यासंदर्भात समीर वानखेडे यांनी एका इंग्रजी वृत्तपत्राला स्पष्टीकरण दिले आहे. भारतीय महसूल सेवेमध्ये (IRS) रुजू झाल्यापासून हा परवाना आपल्या नावे असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. या परवान्याचा कायदेशीर हक्क समीर यांचे वडील ज्ञानदेव वानखेडे (dnyandev wankhede) यांच्याकडे देण्यात आले आहेत. यात बेकायदेशीर काहीच नसून या परवान्याबद्दलचाही उल्लेख संपत्तीच्या हिशोबात केला गेला आहे. हा उल्लेख आताच नाही तर २००६ मध्ये सेवेत रूजू झाल्यापासून माझ्या वार्षिक स्थावर मालमत्तेमध्ये करत असल्याचेही त्यांनी सांगितले. इतकच नाही तर या उद्योगामधून मिळणाऱ्या कामाईचा सर्व उल्लेख प्राप्तिकर परताव्याच्या कागदपत्रांमध्ये केल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

Web Title :- Kranti Redkar | NCB officer sameer wankhede’s wife kranti redkar criticizes ncp minister nawab malik over his alligation dnyandev wankhede state excise department

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Pune Crime | पुण्यात दुध घेण्यासाठी बाहेर पडलेल्यांचे मोबाईल चुटकीत ‘गायब’ करणारा CCTV मध्ये कैद ! पुण्याच्या मध्यवस्तीसह भारती विद्यापीठ अन् वारजे माळवाडी परिसरातून चोरलेले 22 हॅन्डसेट जप्त

 

Sameer Wankhede | समीर वानखेडेंच्या लग्नपत्रिकेत वडिलांचे नाव दाऊद; निलोफर मलिक यांनी शेअर केली लग्न पत्रिका

Wedding Cost Cutting | कमी खर्चात करायचंय का लग्न? ‘या’ 7 ट्रिक वाचवतील तुमचा पैसा; जाणून घ्या

Sameer Wankhede | समीर वानखेडेंच्या लग्नपत्रिकेत वडिलांचे नाव दाऊद; निलोफर मलिक यांनी शेअर केली लग्न पत्रिका

Pollution Side Effects | फुफ्फुसे डॅमेज करते प्रदूषण, खाण्याच्या ‘या’ 8 गोष्टींनी होईल बचाव; जाणून घ्या