×
Homeताज्या बातम्याKranti Redkar | शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांच्या स्मृतिदिनी क्रांती रेडकरने केलं ट्वीट; म्हणाली…

Kranti Redkar | शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांच्या स्मृतिदिनी क्रांती रेडकरने केलं ट्वीट; म्हणाली…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  Kranti Redkar | शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आज (17 नोव्हेंबर) रोजी नववा स्मृतिदिन आहे. त्यानिमित्ताने अनेक राजकारणी, समाजकारणी, कलाकार व्यक्तींनी अभिवादन केलं आहे. तसेच सोशल मिडियावरही अनेकांनी पोस्ट करत अभिवादन केलं आहे. यातच मुंबई एनसीबीचे (NCB) विभागीय संचालक समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्या पत्नी अभिनेत्री क्रांती रेडकर (Kranti Redkar) यांनीही बाळासाहेबांच्या स्मृतिदिनी ट्वीट केलं आहे. या ट्वीटने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतलंय.

 

राज्यात मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) आणि समीर वानखेडे यांच्यात आरोपांच्या फैरी झडत आहेत.
या पार्श्वभुमीवर नुकतंच क्रांती रेडकरनी प्रतिक्रिया देत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना लिहिलेल्या पत्रामध्ये बाळासाहेबांचा उल्लेख केला होता.
“आज बाळासाहेब असते तर त्यांना हे नक्कीच पटलं नसतं, एका महिलेवर आणि तिच्या परिवारावर होणारे खासगी हल्ले हे राजाकारणांच किती नीच स्वरुप आहे.
हे नेहमीच त्यांच्या विचारातून आमच्यापर्यंत पोहोचलेलं आहे. आज ते नाही पण तुम्ही (उद्धव ठाकरे) आहात. असं पत्रामध्ये म्हटलं होतं.

 

दरम्यान, क्रांती रेडकरनी (Kranti Redkar) ट्विटर अकाऊंटवर बाळासाहेब ठाकरे यांच्यासाठी ट्वीट केले आहे की.
‘आज हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृतिदिन. विनम्र अभिवादन. जय महाराष्ट्र’ असे ट्वीट क्रांतीने केले आहे.

 

Web Title : Kranti Redkar | ncb officer sammer wankhede wife and Actress kranti redkar tweet on balasaheb thackeray death anniversary

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Pune News | कृषी उत्पन्न बाजार समितीकडून आवारामधील पार्किंग शुल्क रद्द !

WhatsApp Desktop App | आले WhatsApp चे नवीन अ‍ॅप, विना फोन डेस्कटॉपवर वापरा WhatsApp, जाणून घ्या कसे?

Syed Mushtaq Ali Trophy | राहुल द्रविडच्या ‘या’ शिष्याचे धमाक्यात कमबॅक ! 

Stay Connected
534,500FansLike
125,687FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
Related News