NCB अधिकारी असलेले पती समीर वानखेडेंवरील हल्ल्यानंतर अभिनेत्री क्रांती रेडकरनं शेअर केली पोस्ट ! म्हणाली…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरो (NCB) चे अधिकारी समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्यासह इतर कर्मचाऱ्यांवर गोरेगाव येथे ड्रग्ज पेडलरकडून हल्ला करण्यात आला. यानंतर आता समीर वानखेडे यांची पत्नी अभिनेत्री क्रांती रेडकर (Kranti Redkar) हिनं यावर भाष्य केलं आहे. सोशलवर पोस्ट शेअर करत क्रांतीनं समीर ठीक असल्याचं सांगितलं आहे.

आपल्या पोस्टमध्ये क्रांती म्हणते, तुम्ही दाखवलेल्या प्रेमाबद्दल आभार. समीर वानखेडे यांची तब्येत ठीक आहे. आमच्या घरातील सर्व कुटुंबीय त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत, एनसीबीच्या संपूर्ण टीमला सलाम. आम्हाला तुमचा अभिमान आहे.

बॉलिवूडमधील ड्रग्स केसचा तपास करणाऱ्या नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरो (NCB) नं जेव्हा ड्रग्ज प्रकरणी सिनेमातील कलाकारांवर कारवाई केली, तेव्हा त्यात समीर यांचाही समावेश होता. समीर एनसीबीचे विभागीय संचालक आहेत. बॉलिवूडचं ड्रग्ज कनेक्शन त्यांनीच उघड केलं होतं. त्यांच्यासह त्यांच्या टीमवर जो काही हल्ला झाला आहे, त्या प्रकरणी आता 3 जणांना ताब्यातही घेण्यात आलं आहे.

समीर वानखेडे यांच्यावर जो हल्ला झाला, त्यावेळी ते कॅरी मेंडिस याला पकडायला गेले होते. यावेळी एकूण 5 लोकांच्या टीमचा समावेश होता. याच कारवाईदरम्यान या टीमवर हल्ला झाला.

You might also like